Baramati Election : बारामतीमध्ये मतदारांना दमदाटी, वहिनींच्या आरोपावर अजितदादा स्पष्टच म्हणाले...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Baramati Election : बारामतीमध्ये काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे. मात्र, बारामतीमध्ये अजितदादांना मात्र वहिनींच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.
बारामती : राज्यातील हायव्हो्ल्टेज लढतीपैकी एक निवडणूक बारामती विधानसभा मतदारसंघात होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. अजित पवार आणि युगेंद्र यांच्या लढतीने राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे. मात्र, बारामतीमध्ये अजितदादांना मात्र वहिनींच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.
बारामतीत मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटत असल्याने शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी आक्षेप घेतला. त्याशिवाय काही ठिकाणी बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. मतदारांना दमदाटी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर शर्मिला पवार यांनी बारामतीमधील मतदारसंघातील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे कार्यकर्तेदेखील होते.
advertisement
अजित पवारांनी आरोप फेटाळले...
अजित पवारांनी मात्र शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणत्याही प्रकारे दमदाटी झाली नसल्याचे म्हटले. हे सगळे आरोप धादांत खोटे असून मतदान केंद्रावर सीसीटीव्ही आहेत. त्यातील फूटेज पाहुन निवडणूक अधिकारी कार्यवाही करतील असेही अजित पवारांनी म्हटले. मी एवढ्या निवडणूक लढवल्यास असून आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार कार्यकर्त्यांनी केला नसल्याचे अजित पवारांनी म्हटले.
advertisement
शर्मिला पवारांनी आरोप काय केले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोपही शर्मिला पवार यांनी केला. त्यांनी म्हटलं की, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मतदारांकडे चिठ्ठ्या असून त्यावर शिक्के मारून आत सोडलं. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या.मी संपवतो, तुला खल्लास करतो अशी भाषा इथं सुरू आहे.
advertisement
राज्यात आज मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
या मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमवत आहेत. 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 लाख 427 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 20, 2024 1:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati Election : बारामतीमध्ये मतदारांना दमदाटी, वहिनींच्या आरोपावर अजितदादा स्पष्टच म्हणाले...


