advertisement

अजित पवारांची सावलीही अनंतात विसावली, बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्यावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

Last Updated:

अजित पवार कुठेही गेले तरी त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे.

News18
News18
बुधवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवारांची सावली म्हणून वावरणारे त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. काल अपघातानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फलटण तालुक्यातील तरडगाव या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मागील काही वर्षांपासून अजित पवार यांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अजित पवार कुठेही गेले तरी त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. त्यामुळे त्यांना अजित पवारांची सावली देखील म्हटलं जायचं. पण बुधवारी झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला.
advertisement
या घटनेनंतर बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विदीप जाधव यांचं पार्थिव तरडगावच्या पालखी स्थळावर आणण्यात आलं. याठिकाणी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरडगाव मध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधी पार पाडण्यात आला. यावेळी त्यांना पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना मानवंदना दिली. विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
advertisement
दुसरीकडे, आज सकाळी अकरा वाजता अजित पवारांवर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा अत्यंविधीचा कार्यक्रम पार पडला. या घटनेनं पवार कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं आहे. अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांची सावलीही अनंतात विसावली, बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्यावर साताऱ्यात अंत्यसंस्कार
Next Article
advertisement
Ajit Pawar Funeral: पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा Video
पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा
  • अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या.

  • यावेळी एका क्षणामुळे वातावरण आणखीच भावूक झाले.

View All
advertisement