Baramati : नवऱ्याची अनैसर्गिक संबंधासाठी जबरदस्ती, सासऱ्याने बलात्कार केला, बारामतीच्या महिलेवर सासरी अमानुष अत्याचार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
25 वर्षांच्या महिलेला पतीने अनैसर्गिक शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, तर सासऱ्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती : 25 वर्षांच्या महिलेला पतीने अनैसर्गिक शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, तर सासऱ्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेचे माहेर नगर जिल्ह्यात आहे, तिच्या वडिलांना कर्करोग आहे. तरीही सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला. तसंच लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस व्यवस्थित वागवल्यानंतर आपल्याला त्रास द्यायला सुरूवात केली. गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी आग्रह धरला जात होता, असंही महिलेने तिच्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. यानंतर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या नवऱ्याने अनैसर्गिक शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेने तिचे माहेर गाठले. अहिल्यानगरमध्ये माहेरी आल्यानंतर महिला थेट पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये केली आणि तिने तक्रारीसाठी अर्ज केला. तिथल्या समुपदेशनासाठी सासरचे लोक एकदाच आले, मात्र त्यानंतर ते फिरकले नाहीत, त्यामुळे महिलेने नाईलाजाने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान या महिलेने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
March 24, 2025 11:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati : नवऱ्याची अनैसर्गिक संबंधासाठी जबरदस्ती, सासऱ्याने बलात्कार केला, बारामतीच्या महिलेवर सासरी अमानुष अत्याचार


