Samruddhi Highway: समृध्दीवरील अपघातांचं 'हे' खरं कारण, प्रशासनाला जाग कधी येणार?

Last Updated:

समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असते. त्यात आता अपघाताचं मूळ कारण समोर आलं आहे...

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा: समृध्दी महामार्गावर आजवर अनेक अपघाच घडले आणि त्यामध्ये शेकडो लोकांनी आजवर जीव गमावला आहे. समृध्दी सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहतो, पुढे मृत्यूचा सापळा ठरतो. परंतु या अपघातांमागे मद्यप्राशन करून वाहने चालवणारे चालक हे देखील एक मोठं कारण आहे. या महामार्गालगत काही ठिकाणी आजही छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याचं समोर येत आहे.
advertisement
महामार्गालगत दारूची विक्री, प्रशासन झोपेत?
समृद्धी महामार्ग हा या महामार्गावर होणाऱ्या अपघात आणि जीवितहानी मुळे नेहमी चर्चेत राहतो. अनेकदा अती वेगाने वाहन चालविण्याने तर कधी चालकास झोप येण्याने अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता या महामार्गालगत असलेल्या बिअर व वाइन शॉपमुळे अपघात वाढत असल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गालगत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहराजवळ अनेक ठिकाणी महामार्गलगत बिअर आणि वाईन शॉप्स आहेत. तर मेहकरजवळ अनधिकृत स्टॉलवर बेकायदेशीर बनावट दारू विकली जाते.
advertisement
या भागात मद्यप्राशन करून ट्रकचालक आणि जड वाहतूक करणारे चालक वाहने चालवतात.यामुळे या वाहनचालकांमुळे अनेक अपघात घडले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना जीव देखील गमावावा लागला आहे. हे प्रकार न थांबल्यास अपघातांची संख्या अशीच वाढत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता हे बार नेमके कधी बंद होणार? त्यांच्यावर कुणाचा हात आहे? असे सवाल मात्र या निमित्ताने निर्माण होत आहेत.
advertisement
अपघातांची ही देखील आहेत कारणे:
मद्यप्राशन केलेल्या चालकांमुळे समृध्दी महामार्गावर अपघात होतात. असं असताना अपघाताची आणखी काही कारणे समोर आली आहेत. त्यातील प्रमुख कारणं म्हणजे वाहन चालवताना चालकाची बऱ्याचदा डुलकी लागते, बऱ्याचदा रोड हिप्नोसिसचे देखील प्रकार समोर येत असतात. यामध्ये सतत एकसारखा रस्त्या पाहण्याने चालकांची झोप लागते. अशी काही अपघाताची कारणे आहेत. यावर विश्रामासाठी स्पॉट्स बनवणे, काही ठिकाणी मदतीसाठी यंत्रणा उभारणे अशा उपाययोजनांची गरज आहे.
advertisement
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला केला होता. अवघ्या देशात चर्चेचा विषय ठरलेला असा समृध्दी महामार्ग. या महामार्गावरील अपघात कमी व्हावेत  यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Highway: समृध्दीवरील अपघातांचं 'हे' खरं कारण, प्रशासनाला जाग कधी येणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement