पोलिसांनी धक्का मारला आणि कुटुंबाचा जीव वाचला, बीड बायपासवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Last Updated:

बीड बायपासवर अरुण पवार कुटुंबाची कार बंद पडली असताना पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गुंड, प्रभाकर जाधव, राहुल चव्हाण यांनी एक किलोमीटर कार ढकलून मदत केली.

News18
News18
भररस्त्यात रात्रीच्या सव्वा एक वाजता जर तुमची फॅमिली सोबत असताना अचानक कार बंद पडली किंवा कारने दगा दिला तर काय होईल. विचार करूनच अंगावर काटा येईल. बीडच्या बायपासवर पाटोदा येथील अरुण पवार यांच्या कुटुंबावर हाच बाका प्रसंग ओढवला. पण अशा संकटकाळी बीड पोलीस त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने 'देवदूत' ठरले आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी केवळ विचारपूस केली नाही, तर तब्बल एक किलोमीटर कार ढकलून त्या कुटुंबाला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी मदत केली.
नेमकं काय घडलं?
पवार कुटुंबीय पैठण येथील कार्यक्रम उरकून रात्री उशिरा पाटोद्याकडे निघाले होते. बीड बायपासमार्गे मांजरसुंबा कडे जाताना अचानक त्यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि गाडी बंद पडली. बाहेर घोर अंधार, सामसूम रस्ता आणि सोबतीला पत्नी-मुलं... काही अघटित तर घडणार नाही ना, या भीतीने पवार कुटुंबीयांनी कारमध्येच बसून राहणे पसंत केले. अशातच गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाने त्यांची अवस्था पाहिली.
advertisement
पोलिसांचा माणुसकीचा खांदा!
पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर जाधव आणि चालक राहुल चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्या निर्मनुष्य जागी कोणाला मदतीला बोलावणे शक्य नव्हते. त्यामुळे या तिन्ही पोलिसांनी स्वतः कारला धक्का मारण्याचा निर्णय घेतला. सलग एक किलोमीटर कार ढकलल्यानंतर अखेर तिसऱ्या गिअरला गाडी सुरू झाली आणि पवार कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.
advertisement
चोरांच्या धास्तीत मिळाला पोलिसांचा आधार
"माझ्या पत्नीच्या अंगावर दागिने होते आणि आमच्याकडे मौल्यवान वस्तू होत्या. जर पोलिसांऐवजी चोर तिथे आले असते तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही," अशा शब्दांत अरुण पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी बीडमध्ये जाऊन या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कर्तव्यासोबतच माणुसकी जपणाऱ्या या पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांनी धक्का मारला आणि कुटुंबाचा जीव वाचला, बीड बायपासवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement