Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Beed News : डावखर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी घडलेला प्रसंगच सांगितला. आपल्यावर धावून आलेले मारेकरी हे अमरसिंह पंडितांना संपवण्यासाठीच आले होते, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
बीड: मंगळवारी पार पडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीत काही ठिकाणी जोरदार हाणामारी, राडे झाले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंह पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळून आला. गेवराईतील राड्यात जखमी झालेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर जखमी झाले. डावखर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी घडलेला प्रसंगच सांगितला. आपल्यावर धावून आलेले मारेकरी हे अमरसिंह पंडितांना संपवण्यासाठीच आले होते, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
गेवराई नगरपालिका मतदान प्रक्रिया दरम्यान मारामारी व दगडफेकीच्या घटना घडल्या. या दरम्यानच माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई या घरी दाखल होत बाळराजे पवार यांच्यासह 15 ते 20 जणांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत अमृत डावकर यांना मारहाण केली. या सर्व घटनाक्रमाविषयी अमृत डावकर यांनी माहिती दिली.
अमृत डावखर यांनी सांगितले की, दुपारी पावणे बारा वाजता मी कृष्णाई कार्यालय या ठिकाणी असताना एक गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली. काय प्रकार झाला म्हणून बाहेर आलो पाहतो तर बाळराजे पवार गाडीतून खाली उतरले. मी त्यांना पुढे होऊन नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या नावाने शिवीगाळ सुरू केली. त्याला (अमरसिंह पंडित) आज मारायचे खत्म करून टाकायचे असे मोठमोठ्याने बोलू लागले. त्यावर, मी त्यांना सांगत होतो की इथे नाहीत. ते नाहीत तर तू आहेस असे म्हणत मला मारहाण सुरू केली. इतरांनीही मारहाण केली. हातात बेल्ट काठ्या होत्या मला खाली पडून मारहाण केली. माझे काही म्हणणे मांडायला संधी दिली नाही. मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो की, अशा पद्धतीने घरी येणं चुकीचं आहे. त्यांनी माझं कुठलंही ऐकून न घेता अमरसिंह पंडित यांची हत्या करण्याच्या इराद्याने तिथे आले होते. त्यांची हत्या करणे हा खरा हेतू असावा, कारण हे सगळे गुन्हेगार होते, असे डावखर यांनी सांगितले.
advertisement
डावखर यांनी म्हटले की, बाळराजे पवार यांनी 1997 मध्ये इथले शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास बेद्रे यांच्या घरी जाऊन अशाच पद्धतीने हत्या केली होती. त्या हत्या प्रकरणात ते अनेक वर्ष कारागृहात होते. सत्तेचा दुरुपयोग करत त्यांनी शिक्षा माफ करुन घेतली असल्याचं डावखर यांनी सांगितले. त्यांची जागा कारागृहात आहे. त्यांना कारागृहात पाठवा, माझ्यावर जो काही प्राण घातक हल्ला झाला या प्रकरणातील दोषीवर कारवाई करा अशी मागणी डावखर यांनी केली.
advertisement
या मंडळींनी या निवडणुकीच्या दरम्यान जे काही भाषण केले त्या त्या ठिकाणी अमरसिंह यांना धमकावण्याचे प्रकार झालेले आहेत. टीका करताना त्यांनी राजकीय बंधने सगळे मोडून काढली. काल सुद्धा ते त्याच इराद्याने तेथे आले होते. कारागृहात जे लोक त्यांच्यासोबत होते तेच लोक त्यांच्यासोबत गाडीत होते. आमचा ड्रायव्हर तेथे नसता तर माझा देखील जीव गेला असता असेही डावखर यांनी सांगितले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 03, 2025 2:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं








