बीडला 32 दिवस पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला साबण लावून घातली अंघोळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गेल्या 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला असून नागरिक संतप्त झाले आहे,
बीड: बीड शहराला मागील महिनाभरापासून पाणीपुरवठा नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली, 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित आहे. यामुळं बीडचे नागरिक संतप्त झाले आहेत. संतापलेल्या नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घातल निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले असून आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र काडी वडगाव परिसरात मुख्य जलवाहिनी चौदाशे मीटर गंजली आहे. त्यामुळे गेल्या 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झालाय. ज्या ठिकाणी जलवाहिनी गंजली आहे. त्या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी 720 मीटर पाईपलाईन देखील आमदार निधीतून क्षीरसागर यांनी दिली आहे. पाईप बदलण्यास आणखी सहा दिवस लागतील असा अंदाज आहे. पुढील काळात बीड शहराला आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
advertisement
अभ्यंग स्नान घालून लक्षवेधी आंदोलन
शहरात मागील महिनाभरापासून नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नाहीये. त्यामुळे आज संतप्त महिलांसह शिवसेना ठाकरे गटाने नगरपालिकेबाहेर लक्ष वेधी आंदोलन केले. दरम्यान पाण्याचे माठ फोडून पालिकेच्या प्रवेशद्वाराला छोट्या घागरींचे तोरण बांधले गेले. तर उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडकरांच्या व्यथा जाणून घेऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. यासाठी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
advertisement
टँकर चालकांकडून देखील नागरिकांची पिळवणूक
शहराला माजलगाव बॅक वॉटरने पाणीपुरवठा होतो. मात्र पालिकेने भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम हाती घेतल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. त्यामुळे महिलांनी नगरपालिकेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.. शहराला पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरचा आधार घ्यावा लागतोय. मात्र टँकर चालकांकडून देखील नागरिकांची पिळवणूक सुरू असल्याचं संतप्त महिलांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडला 32 दिवस पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला साबण लावून घातली अंघोळ










