Astrology: खूप वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी! पण अधिकारी, IAS-IPS होण्यासाठी कुंडलीत असा योग जुळून येणे पूरक

Last Updated:

IAS IPS Yog In Kundali: आयएएस आणि आयपीएस अधिकारी होणं हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. या प्रतिष्ठेच्या नोकरीसाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात, पण कधी कधी वारंवार अपयश पदरी येतं. अशा वेळी मनात प्रश्न येतो की, अभ्यासासोबतच कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुद्धा अधिकारी होण्यासाठी महत्त्वाची असते का?

News18
News18
मुंबई : आपल्या देशात आयएएस आणि आयपीएस अधिकारी होणं हे लाखो तरुणांचे स्वप्न असतं. या प्रतिष्ठेच्या नोकरीसाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात, पण कधी कधी वारंवार अपयश पदरी येतं. अशा वेळी मनात प्रश्न येतो की, अभ्यासासोबतच कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुद्धा अधिकारी होण्यासाठी महत्त्वाची असते का? ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर कठोर मेहनतीला जेव्हा ग्रहांची साथ मिळते, तेव्हाच प्रशासकीय सेवेची दारं उघडतात असं मानलं जातं.
प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कुंडलीतले सूर्य आणि मंगळ हे दोन ग्रह खूप बलवान असावे लागतात. सूर्य हा सत्तेचा आणि अधिकाराचा कारक आहे, जो आयएएस पदासाठी आवश्यक असतो. तर मंगळ हा शिस्त आणि धैर्याचा कारक असल्याने आयपीएस पदासाठी महत्त्वाचा मानला जातो. याचसोबत कुंडलीतलं पहिलं घर म्हणजेच लग्न स्थान आणि नववं भाग्य स्थान मजबूत असेल तर व्यक्तीची इच्छाशक्ती दांडगी राहते. तिसरं घर धाडस दाखवतं, तर चौथं आणि पाचवं घर जनतेशी असलेलं नातं आणि बुद्धिमत्ता दर्शवतं.
advertisement
सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे कुंडलीतलं दहावं घर. हे घर राज्य आणि उच्च पदांशी संबंधित असतं. जर या घराचा स्वामी शुभ ग्रहांच्या प्रभावात असेल, तर सरकारी अधिकारी होण्याची शक्यता खूप वाढते. सूर्य जर दहाव्या किंवा नवव्या घरात असेल आणि तो स्वतःच्या किंवा मित्र राशीत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याचे गुण उपजतच असतात. याउलट सूर्य जर सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असेल किंवा त्यावर राहू-केतूचा प्रभाव असेल, तर सरकारी नोकरी मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
advertisement
केवळ पद मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर ते टिकवून ठेवण्यासाठी शनीची साथ लागते. शनि हा शिस्त आणि कष्टाचा ग्रह आहे. जर कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तरच व्यक्ती दीर्घकाळ पदावर टिकून राहू शकते. पोलिसात जाण्यासाठी मंगळ, शिक्षणासाठी गुरु आणि उत्तम भाषणासाठी बुधाची साथ गरजेची असते.
advertisement
आपल्यापैका कोणाला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असेल तर सूर्य देवाला प्रसन्न करणं फायदेशीर ठरू शकतं. यासाठी रविवारी मिठाशिवाय उपवास करणं, दररोज सूर्याला पाणी अर्पण करणं आणि सूर्य चालीसा वाचणं हे उपाय सांगितले जातात. आपल्या वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर केल्यानेही सूर्याचं बळ वाढतं. अंगात पांढरे किंवा केशरी कपडे घालणं आणि गरजूंना दान देणं या गोष्टींमुळेही ग्रहांची अनुकूलता वाढायला मदत होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: खूप वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी! पण अधिकारी, IAS-IPS होण्यासाठी कुंडलीत असा योग जुळून येणे पूरक
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement