काम देतो म्हणाले अन् डांबून ठेवलं, बीडमध्ये तरुणीवर तिघांचा आळीपाळीने अत्याचार, तृतीयपंथीनेच अडकवलं जाळ्यात

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २० वर्षीय तरुणीवर तीन जणांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आहे.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
बीड जिल्ह्यातील परळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २० वर्षीय तरुणीवर तीन जणांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित तरुणीला काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून तिला एका खोलीत डांबून अत्याचाराचा कळस गाठला आहे. या प्रकरणी अंबाजोगई ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दखल केला आहे. यातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे आणि एक तृतीयपंथी अलं गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी ही मूळची हैदराबादची आहे. ती मुंबईत घरगुती साफसफाईचं काम करत आपला उदरनिर्वाह चालवत होती. घटनेच्या दिवशी ती मुंबईहून हैदराबादला आपल्या गावी जात होती. रेल्वेने प्रवास करत असताना भूक लागल्याने ती परळी रेल्वे स्टेशनवर उतरली. एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिची ओळख तृतीयपंथी पूजा गुट्टे हिच्याशी झाली. पूजाने तिच्याशी बोलून तिच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तिला चांगल्या कामाचे आमिष दाखवले. त्यानंतर, पूजाने तिचे साथीदार सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) यांना बोलावले.
advertisement
त्यानंतर हे तिघे तरुणीला दुचाकीवरून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका खोलीत नेऊन त्यांनी तरुणीला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. शनिवारी पहाटे एका नागरिकाने डायल ११२ वर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ अस्वलआंबा येथे धाव घेतली आणि पीडित तरुणीची सुटका केली.
advertisement
मात्र पोलिसांना पाहताच तृतीयपंथी पूजा गुट्टेने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना तत्काळ ताब्यात घेतले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी पूजा गुट्टेचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
काम देतो म्हणाले अन् डांबून ठेवलं, बीडमध्ये तरुणीवर तिघांचा आळीपाळीने अत्याचार, तृतीयपंथीनेच अडकवलं जाळ्यात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement