'आम्हाला मारहाण करून...', महादेव गित्तेचा पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाला 'वाल्मिक कराडला 307 मधून...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahadev Gitte Alligation On Police : आम्हाला बळजबरीने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आलं, असं बापू आंधळे प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते याने खळबळजनक दावा केला आहे.
Bapu Andhale Murder Case : काही दिवसांपूर्वी मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे (Bapu Andhale) यांना गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते (Baban Gitte) याच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच महादेव उद्धव गित्ते याच्यावर देखील गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. अशातच आता महादेव गित्ते (Mahadev Gitte) याने आपल्या मारहाण करून गुंतवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाला महादेव गित्ते?
आम्हाला बळजबरीने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आलं, असं बापू आंधळे प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते याने खळबळजनक दावा केला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून आम्हाला गोवण्यात आलं. आमचा काहीच संबंध नव्हता. वारंवार अॅप्लिकेशन देऊन देखील काहीही मिळालं नाही. गोट्या गित्तेने माझ्या घरी येऊन हाणामारी करून आम्हाला फसवलं. बापू आंधळे हत्या प्रकरणात 307 मधून वाल्मिक कराड याला वगळण्यात आलंय. पण 120 ब मध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय, असंही महादेव गित्ते याने म्हटलं आहे.
advertisement
आमच्यावर जो अन्याय झाला, त्याला न्याय कधी मिळणार, असा जाब महादेव गित्तेच्या पत्नीने सरकारला विचारला आहे. ज्यांनी गुन्हे केले नाहीत, त्यांना जेलमध्ये ठेवलंय आणि ज्यांनी गुन्हे केलेत. त्यांना मोकार बाहेर सोडण्यात येतंय. आमची जगायची इच्छा संपलेली आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर एसपी ऑफिससमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा देखील महादेव गित्तेच्या पत्नीने दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये हा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
बापू आंधळे हत्या प्रकरण
दरम्यान, 29 जून 2024 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरालवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहारकर आणि राजेश वाघमोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jul 19, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
'आम्हाला मारहाण करून...', महादेव गित्तेचा पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाला 'वाल्मिक कराडला 307 मधून...'








