Beed Crime : वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, बाळा बांगरच्या पत्नीशी संवाद, छळ केल्याचा सनसनाटी आरोप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Walmik Karad audio clip goes viral : सोशल मीडियावर वाल्मीक कराडची आणखी एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये बाळा बांगर यांच्या पत्नीशी वाल्मीक कराड संवाद साधत असल्याचे ऐकायला मिळतंय.
Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी काही दिवसांपासून वाल्मीक कराडविरोधात पत्रकार परिषद घेत वेगवेगळे खळबळजनक आरोप केलेले आहेत. यानंतर आता बाळा बांगरच्या पत्नीशी संवाद साधत असलेली वाल्मीक कराडची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आता बीडच्या राजकीय वर्तुळात तसेच गल्लोगल्लीत देखील याचीच चर्चा होताना दिसतीये.
वाल्मीक कराडची क्लिप व्हायरल
सध्या सोशल मीडियावर वाल्मीक कराडची आणखी एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये बाळा बांगर यांच्या पत्नीशी वाल्मीक कराड संवाद साधत असल्याचे ऐकायला मिळतंय. यामध्ये संबंधित महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून वाल्मीक कराड विनंती करत असून सदर महिला मात्र बाळा बांगर याच्यासह त्याच्या आई-वडिलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करताना दिसतीये. यावर वाल्मीक कराडकडून मदतीचे आश्वासन देखील दिल्याचं ऐकायला मिळतंय. ( न्युज 18 लोकमत या क्लिपची पुष्टी करत नाही)
advertisement
बाळा बांगर यांचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी बुधवारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील फोटो माध्यमांसमोर आणली. महादेव मुंडे यांचा खून हा पाळत ठेवून करण्यात आला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांना एकटे गाठून धारदार शस्त्राचे वार करण्यात आले. मारेकऱ्यांनी आधी त्यांच्या पायावर वार केले, नंतर मानेवर वार केल्याचा दावा बाळा बांगर यांनी केलाय.
advertisement
हुंडा घेतला, चरित्र्यावर संशय
दरम्यान, चार वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं, ते मला व्यवस्थित नांदवत नाहीत. मारहाण करतात, त्यांची आई आणि बहिण यामध्ये सामील आहेत, ते त्याला पाठिंबा देतात, असा आरोप या कथित ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे. मला घराबाहेर काढलं, माझ्या वडीलांकडून यांनी हुंडा घेतला. माझी नणंद सर्वांना शिकवते. मला मारहाण करतात. माझ्या चरित्र्यावर संशय घेतात, असंही या क्लिपमधून ऐकायला मिळत आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
July 25, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, बाळा बांगरच्या पत्नीशी संवाद, छळ केल्याचा सनसनाटी आरोप!