Video : अजितदादा म्हणाले 'डोळ्यात तेल घालून पाहा', इकडं बीडमध्ये 'रात्रीस खेळ चाले', चाकू अन् पैशासह दोन तरुणांना पकडलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed distributing money before voting day : रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवरून बोलताना दिली.
Beed Election News (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रात्रीतून दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असलेल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातील पेठ बीड भागातील सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. स्कुटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
पोलीस म्हणाले पैसे सापडलेच नाहीत
तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही. रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवरून बोलताना दिली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा
मात्र, पोलिसांनी वेगळी भूमिका मांडली असली तरी व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांच्या काही नोटा देखील दिसत आहेत. तर डिक्कीमध्ये चाकू असल्याचं कोणीतरी व्हिडीओमध्ये बोलत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अशा लोकांना पाठीशी घातलंय का? असा सवाल विचारला जात आहे.
बीडमध्ये 'रात्रीस खेळ', पैसे वाटप केल्याचा आरोप pic.twitter.com/SPHkyvlfn9
— News18Lokmat (@News18lokmat) December 2, 2025
advertisement
ईव्हीएम मशीन बंद
दरम्यान, बीड शहरातील वार्ड क्रमांक 15 यशवंतराव नाट्यगृह येथील मधील ईव्हीएम मशीन बंद झालं आहे. मशीनमध्ये एरर येत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झालाय. दुसरे मशीन बसवण्याची उमेदवाराकडून मागणी केली जात आहे.
अजितदादांचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान, उमेदवारांनो आजची रात्र डोळ्यात तेल घालून पहा. मतदार आदल्या रात्री खूप विचार करत असतात. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदार ही जागे असतात. घराबाहेर आवाज आला की आतून मतदार म्हणतो, होय - होय मी जागा आहे, कोणाला मतदान करायचं हे विचार करतोय, असं वक्तव्य अजित पवार यांनी राजगुरूनगरच्या सभेत केलं होतं.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
December 02, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Video : अजितदादा म्हणाले 'डोळ्यात तेल घालून पाहा', इकडं बीडमध्ये 'रात्रीस खेळ चाले', चाकू अन् पैशासह दोन तरुणांना पकडलं!


