Beed Loksabha Election Result : मनोज जरांगे इज ब्रँड, पंकजा मुंडेंना बीडमध्ये बसला फटका, नेमकं काय घडलं?

Last Updated:

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पाचव्या फेरीच्या अखेरीस बजरंग सोनवणे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

News18
News18
बीड, प्रतिनिधी : बीडमध्ये यावेळी महायुतीकडून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं.  ही निवडणूक अटितटीची झाली. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बीडमधून धक्कादायक निकाल समोर येत आहे. मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पाचव्या फेरीच्या अखेरीस पंकजा मुंडे यांना 114433 इतकी मतं मिळाले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना  एकूण 123374 मतं मिळाले आहेत. बजरंग सोनवणे यांनी पाचव्या फेरीच्या शेवटी 8941 मतांची आघाडी घेतली आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे शिरूरमधून तर सुप्रिया सुळे या बारामतीमधून आघाडीवर आहेत. शिरूर आणि बारामतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Loksabha Election Result : मनोज जरांगे इज ब्रँड, पंकजा मुंडेंना बीडमध्ये बसला फटका, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement