गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yashashri Munde Enter in Politics : बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. याच गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीने राजकारणात एन्ट्री केलीये.
Vaidyanath Urban Cooperative Bank elections beed : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री झाली आहे. बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले आहेत. राजकारणापासून दूर असलेल्या यशश्री मुंडे ना सहकाराच्या माध्यमातून लॉन्चिंग केली जात असल्याची चर्चा आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर आजतागायत या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निर्विवाद निवडून आलेले आहे. त्यामुळे आता यशश्री मुंडे यांची राजकारणात शानदार एन्ट्री होईल, यात काही वाद नाही.
निवडणूक यंदाही बिनविरोध होणार?
14 जुलैला छाननी आणि 15 ते 29 जुलैदरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यावेळी देखील एकत्र दिसतील. यापुर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही दोघांनी मिळून बिनविरोध केली होती.
advertisement
12 जागांसाठी 52 अर्ज
सर्वसाधारण मतदार संघातून 12 जागांसाठी 52 अर्ज आले आहेत तर अनुसुचित जमातीमधून एका जागेसाठी 4, भटक्या विमुक्त जाती जमाती विमाप्रच्या एका जागेसाठी 4, इतर मागासवर्गच्या एका जागेसाठी 6 तर महिलांच्या दोन जागांसाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैद्यनाथ बँकेला यावेळी बिनविरोध संचालक मंडळ मिळणार की निवडणूक होणार? असा सवाल देखील विचारला जात आहे.
advertisement
कोण आहेत यशश्री मुंडे?
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भगिनी यशश्री मुंडे या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरवही करण्यात आला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर यशश्री यांनी राजकारणापासून स्वत:ला दोन हात लांब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मुंडेंच्या तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग कसं असेल? यावरून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jul 12, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज!









