advertisement

प्यार हमे किस मोड पर ले आया! बीडमध्ये PSI ला कपडे फाटेपर्यंत मारहाण, महिलेच्या पतीने दोघांना धू धू धुतलं

Last Updated:

बीडमध्ये एक अजब प्रेमाची गजब घटना समोर आली आहे. इथं एका विवाहित महिलेनं ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. गुन्हा दाखल केला, त्याच्यासोबत फिरायला गेल्याची घटना समोर आली आहे.

News18
News18
बीडमध्ये एक अजब प्रेमाची गजब घटना समोर आली आहे. इथं एका विवाहित महिलेनं ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. गुन्हा दाखल केला, त्याच्यासोबत फिरायला गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर त्याने दोघांना रंगेहाथ पकडून भररस्त्यात मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार खाणारी व्यक्ती पोलीस दलात उपनिरीक्षक आहे. अशा प्रकारे एका पोलिसाला भररस्त्यात मारहाण झाल्या बीडच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रवींद्र शिंदे असं मारहाण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून बीड पोलीस दलात रुजू झाले होते. अलीकडेच संबंधित विवाहित महिलेनं शिंदे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले आहे. अत्याचारातून आपण गर्भवती राहिल्याचा देखील तिने आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र शिंदे फरार होते. आता ज्या महिलेनं आरोप केला होता, तिच्यासोबत बीड शहरात फिरताना ते आढळले आहेत. याची माहिती महिलेच्या पतीला मिळताच त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून भररस्तात मारहाण केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र शिंदे हे पीडित विवाहितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शिंदे यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतरही त्याने पीडितेच्या घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार जून आणि जुलै २०२५ दरम्यान घडला असून, याच काळात पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली होती. या अत्याचारप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून शिंदे फरार होते.
advertisement

शुक्रवारी भररस्त्यात पतीचा संताप

फरार असलेला शिंदे बीडमध्ये येऊन पीडितेसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच पीडितेच्या पतीने पाळत ठेवली. शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजता, पीडिता आणि शिंदे एका कारमधून (एमएच २३ बीसी ३४०२) भाग्यनगर परिसरात फिरत असताना पतीने त्यांना पाहिले. पतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. तुळजाई चौक, नगर नाका आणि अखेरीस बसस्थानकासमोर पतीने आपली दुचाकी आडवी लावून कार थांबवली. संतापाच्या भरात त्यांनी शिंदेला कारमधून खाली खेचले आणि कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. या गोंधळामुळे बसस्थानकासमोर मोठी गर्दी जमली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
प्यार हमे किस मोड पर ले आया! बीडमध्ये PSI ला कपडे फाटेपर्यंत मारहाण, महिलेच्या पतीने दोघांना धू धू धुतलं
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement