advertisement

'अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवायचंय', बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून ऑफर

Last Updated:

Bomb Threat to Ayodhya Temple: बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील एका तरुणाला सोशल मीडियावर अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची ऑफर देण्यात आली आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला सोशल मीडियावर अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची ऑफर देण्यात आली आहे. संबंधित मेसेज पाकिस्तानच्या कराचीमधून एका संशयिताने पाठवला आहे. त्यात अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 लाख रुपयांची ऑफर आणि कराचीचे लोकेशन

मेसेज पाठवणाऱ्या संशयिताने आपण पाकिस्तानी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपले कराचीमधील लोकेशनही तरुणाला पाठवले. एवढेच नाही, तर या कटात सहभागी होण्यासाठी त्याने १ लाख रुपयांची ऑफर दिली. "या कामासाठी आपल्याला ५० लोक हवे आहेत. प्रत्येकाला १ लाख रुपये दिले जातील आणि मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्सही पुरवले जाईल," असं संशयिताने मेसेजमध्ये म्हटले आहे.
advertisement

ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटले?

संशयिताने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं की, "सोचके बताओ, हमारा साथ दो, मूंह खोल तुझे अमाउंट चाहिये. हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उड़ाना है. इस काम के लिए हमे पचास बंदे चाहिये, आरडीएक्स पोहोच जायेगा. जो बंदे काम करेंगे उनको एक-एक लाख मिलेगा.' जर तू करू शकणार नसशील तर दुसरा कुणाचा नंबर देऊ शकतो.., असंही समोरील व्यक्तीने सांगितलं.
advertisement
आता ही मेसेजवरील व्यक्ती नक्की कोण आहे? ती खरीच पाकिस्तानची रहिवासी आहे का? त्यांचा राम मंदिरवण्याचा डाव आहे का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. मेसेज पाठवणारा व्यक्ती खरोखरच पाकिस्तानचा आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पण एका भारतीय तरुणाला अशाप्रकारे पाकिस्तानमधून ऑफर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
'अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवायचंय', बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून ऑफर
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement