एकेकाळी ट्रॅक्टरवर केले काम, आज दिवसाला 60 हजार रुपयांची कमाई, बीडमधील तरुणाची भन्नाट कहाणी 

Last Updated:

हॉटेल व्यवसाय मध्ये स्वतःचा जम बसवत युवकाने मागील काही वर्षापासून स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलेल आहे.

+
हॉटेल

हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून युवकाने केली लाखोंची कमाई

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड - हॉटेल व्यवसाय हा अनेकांसाठी कमाईचा प्रमुख स्त्रोत ठरलेला आहे. जेवणाची क्वालिटी उत्तम असल्यावर ग्राहकांचा देखील अगदी चांगला प्रतिसाद मिळतो. या व्यवसायाच्या माध्यमातून आज अनेक जण यशस्वी झाले आहेत. आज अशाच एका हॉटेल व्यवसायिकाची कहाणी आपण जाणुन घेणार आहोत.
अतिक शेख असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ते बीड येथील रहिवासी आहेत. अतिक शेख यांची व्यावसायिक भरारी खूप कौतुकास्पद आहे. आज ते दिवसाला हजारो तर महिन्याला लाखो रुपयांची कमाई आपल्या हॉटेल व्यवसायातून करत आहेत.
advertisement
अगदी गावरान पद्धतीने इथे ग्राहकांना जेवण मिळते. ग्राहक देखील अगदी दूरवरून खास करून इथल्या जेवणाची चव चाखण्यासाठी येतात. ग्राहक इथल्या जेवणाला विशेष पसंती देतात. अतिक शेख हे आधी हाताला मिळेल ते काम करायचे. मग त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरवर काम चालू केलं. परंतु तिथूनही पुरेसे पैसे मिळत नव्हते. मग त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांनी स्वतःला हॉटेल व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले.
advertisement
त्यांनी हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी सुरुवात अगदी छोटीशी होती. परंतु आज जर पाहिलं तर त्यांचा हॉटेल व्यवसाय हा अगदी वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचलेला आहे. अतिक शेख हे आज  नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. आधी शून्यातून वर येऊन त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये आपला जम बसवला.
सुरुवातीला या व्यवसायामध्ये त्यांना काही आर्थिक अडचणींना देखील तोंड द्यावे लागले. यानंतर ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी या व्यवसायामध्ये सातत्य टिकवून ठेवले.
advertisement
इथल्या रस्याची चव तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. थेट दूरवरून अतिक शेख यांच्या हॉटेलवर जेवणासाठी आल्यानंतर ग्राहक आपला अनुभव आवर्जून इतरांना सांगतात. अतिक शेख यांच्या कमाई बाबत जाणुन घेतले असता आज ते दिवसाला 50 ते 60 हजार एवढी कमाई करतात. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
एकेकाळी ट्रॅक्टरवर केले काम, आज दिवसाला 60 हजार रुपयांची कमाई, बीडमधील तरुणाची भन्नाट कहाणी 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement