BEL Pune Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीत ट्रेनी इंजिनिअर पदासाठी नोकर भरती, मिळणार 90,000 पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Last Updated:

BEL Pune Bharti 2025: रक्षा मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक आणि तंत्रज्ञ सी हे पदं भरले जाणार आहेत. हे दोन्हीही ट्रेनी पदे आहेत.

BEL Pune Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीत ट्रेनी इंजिनिअर पदासाठी नोकर भरती, मिळणार 90,000 पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?
BEL Pune Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीत ट्रेनी इंजिनिअर पदासाठी नोकर भरती, मिळणार 90,000 पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?
रक्षा मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक आणि तंत्रज्ञ सी हे पदं भरले जाणार आहेत. हे दोन्हीही ट्रेनी पदे आहेत. पात्र उमेदवारांना www.bel-india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. एकूण 38 पदांवर ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचावी. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited Bharti 2025) कंपनीतल्या भरती प्रक्रियेत अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या 28 जागा आणि तंत्रज्ञ सी पदाच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. भरतीत निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया 25 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कंपनीबद्दल सांगायचे झाल्यास ही भारतातील एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करते. या कंपनीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.
advertisement
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकर भरतीमध्ये 38 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंजिनियरिंग केलेले असावे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, फिटर, मशिन ऑपरेटर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदांसाठी ही नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पदे मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी भरली जाणार आहे. एकूण 38 पदांसाठी भरती होणार आहे. प्रोबेशनरी इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे डिप्लोमा, 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
advertisement
जाहिरातीची लिंक
ऑनलाईन अर्जाची लिंक
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 असून कमाल वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांचे 590 रूपये इतके अर्ज शुल्क आहे. तर, अनुसूचित जाती- जमातीच्या उमेदवारांना आणि दिव्यांग व्यक्तींना अर्ज शुल्क नाही. नोकरीसाठी निवड झाल्यावर 24,500 ते 90,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BEL Pune Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीत ट्रेनी इंजिनिअर पदासाठी नोकर भरती, मिळणार 90,000 पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement