मंगेश काळोखे प्रकरणात मोठी अपडेट, फरार मास्टरमाइंड अखेर पोलीस ठाण्यात

Last Updated:

खोपोलीतील मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी भरत भगत पोलिसांसमोर हजर झाला असून तपास सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

News18
News18
मोहन जाधव, प्रतिनिधी रायगड: रायगड जिल्ह्याच्या खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून निवडून येताच पाचव्या दिवशी त्यांच्या पतीची हत्या केली होती. या निर्घृण हत्या प्रकरणात मोठी आता अपडेट समोर आली आहे. या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रायगड जिल्हा प्रवक्ता भरत भगत अखेर खोपोली पोलिसांसमोर हजर झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

२६ डिसेंबर २०२५ रोजी खोपोलीत राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडून परतत असताना त्यांच्यावर तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्याव तब्बल २७ वार करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता.
advertisement

राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी २० लाखांची सुपारी देऊन मंगेश काळोखे यांचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य मारेकऱ्यांसह १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भरत भगत यांची चौकशी सुरू

या हत्याकांडाचा कट रचल्याचा संशय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्यावर व्यक्त केला जात होता. न्यायालयाने यापूर्वीच भरत भगत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर भगत पोलिसांना चकवा देत होता, मात्र आता तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंगेश काळोखे प्रकरणात मोठी अपडेट, फरार मास्टरमाइंड अखेर पोलीस ठाण्यात
Next Article
advertisement
BMC Mayor Election: राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी  मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स वाढवला
राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी मुंबईतील सत्तेचा स
  • बीएमसी सत्ता स्थापनेतील सस्पेन्स वाढत चालला आहे.

  • शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

  • ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याने मुंबईतील राजकारण चांगलंच

View All
advertisement