Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
- Reported by:mohan jadhav
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bharatshet Gogawale: राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रायगड: राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे. आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विकास गोगावले यांना अटक झाल्यास भरत गोगावलेंसाठी मोठा धक्का असणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. महाड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणी माणगाव न्यायालयाने दोन वेळा, तर मुंबई उच्च न्यायालयाने एक वेळा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
advertisement
महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाण, वाहनांची तोडफोड आणि शस्त्र बाळगल्याचे प्रकार घडले होते. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, विकास गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
advertisement
यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी माणगाव न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असला तरी तिथेही दिलासा मिळालेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हणमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे महाडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ो
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 11:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”









