भिवंडीत भाजप-कोणार्क आघाडीत राडा, दगडफेक आणि गुंडागर्दी, दोन्ही गटातील 44 जणांना अटक

Last Updated:

कोणार्क आघाडी आणि भाजप आमदार महेश चौघुले यांच्यात जोरदार राडा झाला.

भिवंडीत कोणार्क आघाडी-भाजपमध्ये राडा
भिवंडीत कोणार्क आघाडी-भाजपमध्ये राडा
नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी : कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या पॅनेलने प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजप आमदार महेश चौघुले यांचा पुत्र मित याचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कोंबडपाडा परिसरात तणावाचे वातावरण असताना रविवारी रात्रीच्या सुमारास विलास पाटील यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक करीत हल्ला केला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने दगडफेक करण्यात झाली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगवला. त्यानंतर पहाटे विलास पाटील यांच्या बंगल्यात बसलेल्या 36 जणांना ताब्यात घेतले तर आमदार महेश चौघुले गटातील ८ जणांना ताब्यात घेऊन भिवंडी न्यायालयात हजर केले.
या राड्यानंतर रात्रभर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आमदार महेश चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरून माजी महापौर विलास पाटील यांच्यासह 100 ते 150 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार आणि इतर १५ ते २० जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेऊन रत्नदीप बंगला येथे हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
तिसरा गुन्हा राजू तडका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजप उमेदवार रितेश टावरे आणि त्यांचे १०० ते १५० अज्ञात लोकांविरोधात घरावर हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी विलास पाटील आणि त्यांचे १०० ते १५० तर भाजपा उमेदवार रितेश टावरे आणि त्यांचे ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement

भिवंडी महापालिकेचा निकाल काय लागला?

भिवंडी महापालिकेच्या २३ प्रभागातील ९० जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला सर्वाधिक ३० जागांवर यश मिळाले तर त्याखालोखाल भाजपने २२ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ जागांवर यश मिळाले आहे. कोणार्क आघाडीला ४ जागांवर यश मिळाले तर भिवंडी विकास आघाडी ३ जागांवर जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस १२ तर अपक्ष उमेदवार एका जागेवर जिंकला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिवंडीत भाजप-कोणार्क आघाडीत राडा, दगडफेक आणि गुंडागर्दी, दोन्ही गटातील 44 जणांना अटक
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement