Parbhani News : पत्नीचं नाक कापलं, बदनामीतून मारहाण, बोगस बियाणं अन् पावसाची प्रतिक्षा, परभणीच्या 5 मोठ्या घटना

Last Updated:

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील मागील आठवड्यातील 5 अशा मोठा घटना ज्याचा जिल्हाच नाही तर राज्यावरही परिणाम होऊ शकतो.

मुंबईतील घटना
मुंबईतील घटना
विशाल माने, प्रतिनिधी परभणी, 12 ऑगस्ट : जगात जर्मनी अन् देशात परभणी असं वाक्य परभणीकर अभिमानाने उच्चारतात. मराठवाड्यात असल्याने परभणी काहीसा दुष्काळी जिल्हा आहे. यंदाही जिल्ह्याला चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. पण, याच परभणीत अनेक अशाही घटना घडत असतात. ज्याची दखल राज्यालाही घ्यावी लागते. या आठवड्यातील अशाच पाच ठळक घडामोडी आपण जाणून घेऊ.
सोनपेठ
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे नाक कापणारा फरार आरोपी, अखेर सहा महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तालुक्यातील शेळगाव येथील, राजू उर्फ कांच्या जुम्मना भोसले यांनी, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे नाक कापलं होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही घटना घडल्यानंतर, त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील झाला होता. परंतु, हा आरोपी फरार असल्यामुळे, पोलिसांचा तपास पुढे सरकत नव्हता. त्याला अखेर यश आले आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
advertisement
मानवत
परभणीच्या मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारामध्ये, शेतातील बोरवेलमध्ये अडकलेल्या चार वर्षीय गोलू सुरेश पिंपळे या बालकाला अखेर काढण्यामध्ये यश आला असून, त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे. गोलू आपल्या आजीसोबत शेतामध्ये गेला असताना, खेळत खेळत तो उघड्या बोरवेल जवळ गेला आणि त्यामध्ये तो पडला होता. त्यानंतर प्रशासनाने जेसीबी आणि इतर यंत्राच्या साह्याने त्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास चार ते पाच तासाचे रेस्क्यू ऑपरेशन नंतर, गोलूला बाहेर काढण्यात आला असून, गोलूला सुखरूप त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
advertisement
मानवत
लोकांसमोर आमची बदनामी का करतो, म्हणून चार ते पाच जणांनी तालुक्यातील केकरजवळा येथे एकाला मारहाण केल्याची घटना घडली असून, यामध्ये कोयत्याचे वार झाल्याच उघडकीस आला आहे. किशन गिरी असं या घटनेमध्ये जखमी झालेल्याचं नाव असून तो घरी असताना गावातील चार ते पाच जणांनी त्याला घराबाहेर ओढून, आमची बदनामी का करतोस असं म्हणून शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यात किशन गिरी यांच्यावर एकानं कोयतेने वार केले. यामध्ये किशन गिरी हे गंभीरित्या जखमी झाले असून, त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित आरोपींच्या विरोधात, मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
advertisement
परभणी
पावसाळा सुरू झाल्यापासून, जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. त्यात मागील दहा ते बारा दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत नागरिकांच्या देखील चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे बहुतांश प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकमेव येलदरी धरण वगळता, इतर सर्वच छोट्या आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये 50% हून कमी जलसाठा राहिलाय. आणि त्यामुळे येणारा काळ परभणीकरांसाठी संकटाचा असल्याचे दिसत आहे. पावसाळा संपण्या अगोदर मोठा पाऊस नाही झाला, तर जिल्ह्या समोर पाणीटंचाईच संकट उभा राहू शकतो.
advertisement
पाथरी
पाथरी तालुक्यातील लोणी येथील शेतकऱ्यांवर कापूस लागवडीनंतर संकट आले असून, लागवड केलेला कापसाला पाते धरत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू झाल्यानंतर, मोठ्या उत्साहामध्ये कापूस पिकाची लागवड केली. होती परंतु शेतकऱ्याला मिळालेलं कापूस बियाणं हे बोगस असल्याचा आता उघडकीस आहे. लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात कापसाची चांगली वाढ झाली, परंतु त्यानंतर कापसाला पाते धरत नाहीये. आणि त्यामुळे शेतकऱ्यावर हा कापूस उपटून फेकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani News : पत्नीचं नाक कापलं, बदनामीतून मारहाण, बोगस बियाणं अन् पावसाची प्रतिक्षा, परभणीच्या 5 मोठ्या घटना
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement