Nanded By poll BJP Candidate : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराची घोषणा, कोणाला मिळाली संधी?

Last Updated:

Nanded By poll BJP Candidate : भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
 नांदेड :  भाजपने आज राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली. या यादीसोबतच भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने नांदेड पोटनिवडणुकीसाठी संतुक हंबर्डे यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
हंबर्डे कुटुंबाचा नांदेड ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. भाजपचे उमेदवार संतुक हंबर्डे यांचे बंधू मोहन हंबुर्डे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार झाले होते.  संतुक हंबर्डे हे नांदेडमधील भाजपचे नेते आहेत. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी भाजपात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
advertisement

विधानसभेसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अगदी काही तास आधी तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. भाजपने 99 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी आणि सोमवारी 25 जणांची तिसरी यादी भाजपने जाहीर केली असून एकूण 146 जणांची घोषणा भाजपने आतापर्यंत केली आहे.
advertisement

भाजपची 25 जणांची तिसरी यादी घोषित

मुर्तिजापूर - हरिश पिंपळे
कारंजा - सई डहाके
तिवसा -राजेश वानखेडे
मोर्शी - उमेश यावलकर
आर्वी - सुमित वानखेडे
काटोल - चरणसिंग ठाकूर
सावनेर - आशिष देशमुख
नागपूर मध्य - प्रवीण दटके
नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले
नागपूर उत्तर - मिलिंद माने
साकोली - अविनाश ब्राह्मणकर
advertisement
चंद्रपूर - किशोर जोरगेवार
आर्णी - राज तोडसाम
उमरखेड - किशन वानखेडे
देगलूर - जितेश अंतापूरकर
डहाणू - विनोद मेढा
वसई - स्नेहा दुबे
बोरीवली - संजय उपाध्याय
वर्सोवा - भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व- पराग शाह
आष्टी - सुरेश धस
लातूर शहर -अर्चना चाकूरकर
माळशिरस - राम सातपुते
कराड उत्तर - मनोज घोरपडे
advertisement
पलुस कडेगाव - संग्राम देशमुख
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded By poll BJP Candidate : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement