अमित शाह यांच्यासोबत बैठक, फडणवीस यांना वरिष्ठांची पसंती, मंत्रिमंडळातील १५ चेहरे समोर!

Last Updated:

अमित शाह यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर काही तासांतच मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून अप्रत्यक्षपणे माघार घेत असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय नेतृत्वाची फडणवीस यांनाच पसंती असल्याचे देखील सांगण्यात येते.
अमित शाह यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री कोण आणि सत्तावाटपाचे समीकरण कसे असेल, यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. येत्या 2 डिसेंबरला राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदे देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे असतील, असेही सूत्रांनी सांगितलंय.
advertisement
यावेळी महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कोण कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, पाहुयात...
देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन - सरकारचे संकटमोचक तसेच उ. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात मोठा वाटा
रवींद्र चव्हाण - कोकणातील जागा मिळवून देण्यात सहभाग
मंगलप्रभात लोढा - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्व
advertisement
चंद्रशेखर बावनकुळे - प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीत चांगलं यश मिळवून दिलं
आशिष शेलार - कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं
गणेश नाईक : नवी मुंबईचा बालेकिल्ला सांभाळला
नितेश राणे - भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा
शिवेंद्रसिंहराजे भोसले - पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात सहभाग
राहुल कुल - राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार
advertisement
माधुरी मिसाळ - पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रिपदाची शक्यता
संजय कुटे - पडद्यामागून काम करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा
राधाकृष्ण विखे पाटील - नगर जिल्ह्यातील मोठा चेहरा
पंकजा मुंडे - ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा
गोपीचंद पडळकर - आक्रमकतेसोबतच धनगर समाज पाठीशी
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमित शाह यांच्यासोबत बैठक, फडणवीस यांना वरिष्ठांची पसंती, मंत्रिमंडळातील १५ चेहरे समोर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement