दोन्ही ठिकाणी महायुतीत वाद, सेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ, अजितदादांना जॅकपॉट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भाजप-शिवसेनेच्या भांडणात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा लाभ झाला आहे.
मुंबई : राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष जसे एकमेकांच्या समोर लढले तसे नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीतही लढले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे भाजप-शिवसेनेच्या भांडणात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा लाभ झाला. बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेतील नाट्यमय घटनांनंतर किंगमेकर ठरलेल्या राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपद मिळाले.
अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष विराजमान केल्यानंतर काँग्रेसला सोबत घेण्याची खेळी करत भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्वाखालील शिवसेनेने भाजपासोबत गेलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना गळाला लावून पूर्ण मॅच फिरवली. अंबरनाथमध्ये शिवसेना-अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली.
advertisement
कुळगाव बदलापुरात काय घडले?
कुळगाव बदलापूर नगर परिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र भाजपच्या रूचिता घोरपडे यांनी सेना उमेदवाराला पराभूत केले. शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक २४ नगरसेवक विजयी झाले. मात्र भाजपने राष्ट्रवादीशी निवडणूक पूर्व युती करून सत्तेचा आकडाही गाठला. शिवसेनेपेक्षा भाजप-राष्ट्रवादीच्या आघाडीची बेरीज एकने अधिक होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियांका दामले यांचे नाव उपनगराध्यक्ष म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
advertisement
कुळगाव–बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक ९ जानेवारीला पार पडली. भाजप–राष्ट्रवादी आघाडीकडे एकूण २६ सदस्य संख्या असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपने राष्ट्रवादीला संधी दिल्याने पक्षाकडून प्रियांका दामले यांचे नाव पुढे करण्यात आले.
विशेष म्हणजे शिंदे सेनेने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी केली होती. परंतु राजकीय समीकरणे पाहता बहुमत भाजप-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे असल्याने संदेश ढमढेरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे दामले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन्ही ठिकाणी महायुतीत वाद, सेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ, अजितदादांना जॅकपॉट










