मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त 1088 ठिकाणी रक्तदान, रवींद्र चव्हाणांचा ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून गौरव

Last Updated:

राज्यभरात या दिवशी ७८,३१३ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या, ही एक विक्रमी कामगिरी मानली जात आहे.

News18
News18
मुंबई :  भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात एकाच दिवशी १०८८ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल घेत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने दोन विशेष रेकॉर्ड्सची नोंद घेतली असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आलं आहे.
या उपक्रमाअंतर्गत एकाच दिवशी सर्वाधिक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा रेकॉर्ड, तसंच एकाच दिवशी सर्वाधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा रेकॉर्ड भाजपच्या नावे नोंदवण्यात आला आहे. राज्यभरात या दिवशी ७८,३१३ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या, ही एक विक्रमी कामगिरी मानली जात आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून देण्यात आलेल्या दुहेरी प्रशस्तीपत्राचे स्वीकृती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. या वेळी त्यांनी सांगितले की, “ही फक्त भाजपाची नव्हे, तर जनतेच्या सहभागाची आणि सेवाभावी वृत्तीची नोंद आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक ठरला आहे.”
advertisement
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिलं. भाजपने या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून एक सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे या प्रसंगी अधोरेखित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन केलं होतं की, माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही पोस्टर बाजी करू नका. वर्तमान पत्रात किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये कोणतीही जाहिरात देऊ नका. त्यानंतर नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महारक्तदान शिबिर आयोजित केलं आणि या शिबिरांनी सर्व जिल्ह्यात मोठा प्रतिसाद पाहायला मोठ्या प्रमाणात मिळालं. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात सामाजिक आणि आरोग्य सेवेत नवा आदर्श निर्माण झाला असून, भाजपचा हा उपक्रम अन्य राज्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त 1088 ठिकाणी रक्तदान, रवींद्र चव्हाणांचा ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून गौरव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement