BMC Election Result Eknath Shinde: मुंबई महापौर निवडीआधी मोठा ट्वीस्ट, शिंदेंचे नगरसेवक 'ताज'मध्ये लॉक! फोडाफोडीची भीती की रणनीती?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Results : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'हॉटेल पॉलिटिक्स'चा आधार घेतला आहे.
मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेची समीकरणे जुळवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'हॉटेल पॉलिटिक्स'चा आधार घेतला आहे. शिवसेनेच्या सर्व विजयी शिलेदारांना वांद्रे येथील आलिशान 'ताज लँड्स एंड' (Taj Lands End) हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे.
आज दुपारी ३ वाजता हॉटेलमध्ये होणार दाखल...
समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता सर्व नगरसेवकांना या हॉटेलमध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीचे राजकारण होऊ नये आणि पक्षाची वज्रमूठ कायम राहावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
किती दिवस हॉटेलमध्येच मुक्काम?
हे सर्व नगरसेवक केवळ आजच नाही, तर पुढील तीन दिवस या हॉटेलमध्ये वास्तव्यास असणार आहेत. या तीन दिवसांच्या काळात नगरसेवकांशी संवाद साधणे, पुढील रणनीती ठरवणे आणि महापौर निवडीबाबत चर्चा करणे, असे कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.
advertisement
'हॉटेल पॉलिटिक्स' पुन्हा चर्चेत
राज्यातील सत्तासंघर्षाच्या वेळीही अशाच प्रकारचे हॉटेल राजकारण पाहायला मिळाले होते. आता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा नगरसेवकांना हॉटेलमध्ये नेले जात असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. इतर पक्षांकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधला जाऊ नये, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Result Eknath Shinde: मुंबई महापौर निवडीआधी मोठा ट्वीस्ट, शिंदेंचे नगरसेवक 'ताज'मध्ये लॉक! फोडाफोडीची भीती की रणनीती?








