advertisement

Buldhana : आई-वडील बाहेर गेले; 14 वर्षांच्या सानिकाने घरात भयानक कृत्य केलं; खामगावात खळबळ

Last Updated:

घरामध्ये आई-वडील नसताना 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास लावून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे.

आई-वडील बाहेर गेले; 14 वर्षांच्या सानिकाने घरात भयानक कृत्य केलं; खामगावात खळबळ
आई-वडील बाहेर गेले; 14 वर्षांच्या सानिकाने घरात भयानक कृत्य केलं; खामगावात खळबळ
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : घरामध्ये आई-वडील नसताना 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास लावून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे. खामगावच्या तायडे कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तायडे कॉलनीमध्ये राहणारे रहिवासी निलेश वरुडकर आणि त्यांच्या पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तेव्हा त्यांच्या मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं.
14 वर्षांच्या सानिका वरुडकरने घरामध्ये आई-वडील नसताना छताच्या टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला साडी लावली आणि गळफास लावून घेतला. घरामध्ये कुणीच नसल्यामुळे ही घटना उशीरा लक्षात आली.
advertisement
14 वर्षांच्या सानिकाने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी सानिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरूवात केली आहे. गळफास लावून घेण्याआधी सानिकाने घरामध्ये कोणती चिठ्ठी लिहून ठेवली होती का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana : आई-वडील बाहेर गेले; 14 वर्षांच्या सानिकाने घरात भयानक कृत्य केलं; खामगावात खळबळ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement