परिवर्तन आघाडी होण्याआधीच धुमशान, राजू शेट्टी-तुपकरांमधला वाद मिटेना

Last Updated:

परिवर्तन आघाडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

News18
News18
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी :  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. परिवर्तन आघाडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यात बैठक देखील झाली. मात्र आता दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील पुण्यात स्वतंत्र बैठक घेणार आहेत. राजू शेट्टी यांच्या बैठकीनंतर आता रविकांत तुपकर यांची पुण्यात बैठक होणार आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
परिवर्तन आघाडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यात बैठक देखील झाली. मात्र आता दुसरीकडे रविकांत तुपकर हे पुण्यात स्वतंत्र बैठक घेणार आहेत. येत्या 24 जुलैला रविकांत तुपकर यांची पुण्यात बैठक पार पडणार आहे. शेतकरी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात तुपकर यांनी ही राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा तुपकर शेट्टी वाद  उघड झाला आहे.
advertisement
छोट्यामोठ्या संघटना एकत्र करून त्यांची मोट बांधत परिवर्तन आघाडी निर्माण करण्यासाठी राजू शेट्टी यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची पुण्यात बैठक देखील पार पडली. मात्र आता तुपकर देखील पुण्यात बैठक घेणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
परिवर्तन आघाडी होण्याआधीच धुमशान, राजू शेट्टी-तुपकरांमधला वाद मिटेना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement