advertisement

मोठी बातमी! राज्यातील आणखी एका बड्या बँकेत मोठा घोटाळा, ठेवीदारांमध्ये भीती, या बँकेत तुमचं तर खातं नाहीना?

Last Updated:

राज्यातील आणखी एका बड्या बँकेत घोटाळा झाल्याचं समोर आलं असून, ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
बुलाढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आणखी एका बँकेमध्ये पैशांचा मोठा अपहार झाला आहे. नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजानन शर्मा असं या संगणक अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही रक्कम इतर बँकेच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली आहे.  या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा अर्बन बँकेचा कनिष्ठ संगणक अधिकारी गजानन शर्मा यानं बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं बँकेतील तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांची रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब बँकेच्या संचालकांच्या लक्षात येताच शर्मा यांच्याविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शर्मा याला अटक केली आहे.
advertisement
 ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण  
दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये भीतीनं वातावरण पसरलं असून, ठेविदारांनी बँकेत गर्दी केली, घडलेल्या प्रकारानंतर यावर बँक व्यवस्थापनाच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, ठेवीदारंच्या ठेवी सुरक्षीत असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
मोठी बातमी! राज्यातील आणखी एका बड्या बँकेत मोठा घोटाळा, ठेवीदारांमध्ये भीती, या बँकेत तुमचं तर खातं नाहीना?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement