Buldhana Lok Sabha Result : बुलढाण्यात कोण मारणार बाजी? प्रतापराव जाधव की खेडेकर?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी वाटणाऱ्या बुलढाणा लोकसभा लढतीत अपक्षांनी देखील चांगलीच रंगत आणली.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडलं होतं. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी वाटणाऱ्या या लढतीत अपक्षांनी देखील चांगलीच रंगत आणली. यावेळी बुलढाणा लोकसभेसाठी तब्बल 62.03 टक्के इतकं मतदान झालं. या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदार संघातील सर्वच खामगाव, जळगाव, बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा आणि चिखली या 6 विधानसभेतील महायुतीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यावेळी महायुतीकडून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी सामाना शिवसेना विरूद्ध शिवसेना ठाकरे गट असा रंगला. शिवसेनेचे जुने सहकारी आमने-सामने असल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि संदीप शेळके यांनी देखील प्रचारात चांगलीच रंगत आणली.
advertisement
दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी चेहरा म्हणून वसंतराव मगर यांना या लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या सामाजिक परिस्थितीवर नजर टाकली असता प्रमुख चारही उमेदवार हे मराठा समाजाचे असल्याने त्यात काही अंशी मताचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवाराला या मतं विभागणीचा फायदा करून घेता आला असता, मात्र वंचित बहुजन आघाडीला त्यात यश आलं नाही.
advertisement
यंदाच्या या निवडणुकीत बुलढाणा लोकसभेसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात होते. मात्र, महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर, तर अपक्ष म्हणून शेतकरी नेते रवीकांत तुपकर आणि बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली.
view commentsLocation :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
June 04, 2024 10:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Lok Sabha Result : बुलढाण्यात कोण मारणार बाजी? प्रतापराव जाधव की खेडेकर?


