Buldhana News : बुलढाण्यात चालत्या एसटी बसवर कोसळली पत्र्याची टपरी! काळाजाचा ठोका चुकवणारा Video
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी पडझडीच्याही घटना घडल्या आहेत.
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : राज्यात सध्या विचित्र वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने दाणादाण सुरू आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दोन ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या दुर्घटना थोडक्यात चुकल्या. एसटी बसवर चक्क पत्र्याची टपरी येऊन आदळली. तर दुसऱ्या घटनेत टेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली. दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खामगाव शेगाव रोडवर एसटीवर पत्रे कोसळले
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर ST बस येत असताना अचानकपणे वादळी वारा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यात वादळी वाऱ्याने चक्क एक लोखंडी टपरी ST बसला धडकली. पाहता पाहता अनेक उडून आलेले टिनपत्रे देखील ST ला मोठ्या प्रमाणात धडकले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काळजाचा ठोका चुकविणारा विडिओ हा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
टेंभूर्णा येथे स्वागतकमान कोसळली
सोसाट्याच्या वाऱ्याने टेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली. त्यामुळे टेंभुर्णा ते मेहकर रस्ता हा पूर्णपणे जाम झाला असून शासनाकडून दिशा दर्शविणारी ही मोठी कमान आहे. 60 ते 70 फूट उंची वर ही स्वागत कमान लावण्यात आली होती. जर या कमानीच्या खाली कुणी सापडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
advertisement
मलकापूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस
view commentsबुलडाणा जिल्ह्यासह मलकापूर शहरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वारा अतिशय वेगाने असल्यामुळे अनेक दुकानांचे पत्र उडून गेले. मलकापूर रेल्वे स्टेशन ते मलकापूर बस स्टॅन्ड पर्यंतच्या रहदारीच्या रोडवरील 15 झाडे पडली आहेत. तसेच अनेक लोकाचे सोलर पॅनल उडाले. चाळीस बिघा परिसरातील मेन रोड वरील 5 झाडे पडली आहे. निमवाडी चौक मधील सर्वात जुने वडाचे झाड पडल्यामुळे 3 दुकानांचे छत पडले आहे. मुख्य रोडवरील मोठ होर्डींग जमीनदोस्त झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेला तुफान पाऊस अनेकांना धडकी भरविणारा होता.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
May 26, 2024 10:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : बुलढाण्यात चालत्या एसटी बसवर कोसळली पत्र्याची टपरी! काळाजाचा ठोका चुकवणारा Video


