शेष नागावरील लक्ष्मी-नारायण! सिंदखेडराजामध्ये उत्खननावेळी सापडली विलोभनीय मूर्ती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Buldhana News: राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणाऱ्या ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरीला अध्यात्मिक वारसा सुद्धा फार मोठा असल्याचे या मूर्तीमुळे अधोरेखित झाले आहे. सिंदखेडराजा नगरीच्या इतिहासावर या घटनेमुळे नवा प्रकाश पडणार आहे.
बुलढाणा : राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनन करताना विष्णू-लक्ष्मीची मूर्ती सापडली. ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जात असून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण समुद्रमंथांचा देखावा अत्यंत सुंदर व सुबक पद्धतीने कोरलेला आहे. भारतामध्ये अशा मूर्ती क्वचितच आढळतात, त्यामुळे सिंदखेडराजा नगरीचे महत्व निश्चितच वाढणार आहे.
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणाऱ्या ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरीला अध्यात्मिक वारसा सुद्धा फार मोठा असल्याचे या मूर्तीमुळे अधोरेखित झाले आहे. सिंदखेडराजा नगरीच्या इतिहासावर या घटनेमुळे नवा प्रकाश पडणार आहे. सिंदखेडराजा येथील स्थानिक नागरिकांनी सदर मूर्तीचे सुरक्षित जतन करावे आणि मूर्ती बाहेरगावी न पाठवता सिंदखेड राजामध्येच ठेवावी, अशी मागणी केली आहे.
advertisement
मूर्ती 12 व्या शतकातील असून या शतकातील किंवा समकालीन असू शकते. अजूनही ऐतिहासिक ठेवा जमिनीखाली असण्याची मोठी शक्यता आहे. त्या दृष्टीने राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोरील मोकळ्या जागेचे उत्खनन करण्यात यावे, तसेच जाधवांच्या समाधीसमोर फार मोठे बारव काळाच्या ओघात जमिनीखाली गेली आहे, त्याचे उत्खनन करण्यात यावे राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. इथे सुद्धा फार मोठ्या मूर्ती व इतर लढाईसाठी वापरले जाणारे साहित्य सापडण्याची शक्यता आहे. तसेच जाधव रावांचा खजिना यासह अनमोल हिरे मोती जड जवाहर व इतर मौल्यवान गोष्टी सापडू शकतात. शहरातील इतर ऐतिहासिक वास्तू जवळसुद्धा उत्खनन करण्यात यावे. सिंदखेड राजा नगरीचा फार मोठा इतिहास जमिनीखाली आहे तो उजेडात आणण्यासाठी उत्खनन करण्याची चळवळ उभी करण्याची गरज जनमाणसात निर्माण झाली आहे.
advertisement

मूर्तीचं स्वरूप -
view commentsशेष नागावर विश्राम अवस्थेतील लक्ष्मी सेवारत विष्णू मूर्ती हातामध्ये शंख, चक्र, गडा, पद्म, नाभितून उत्पन्न कमळ आणि त्यावर ब्रह्मदेव विराजमान असं काहीसं स्वरूप आहे. या मूर्तीच्या प्रभावळ भागात सुंदर, कोरीव समुद्रमंथनाचा देखावा, वासुकी नाग मूर्तीच्या बैठकीवर सुंदर असं नक्षीकाम दिसत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
June 22, 2024 6:40 PM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
शेष नागावरील लक्ष्मी-नारायण! सिंदखेडराजामध्ये उत्खननावेळी सापडली विलोभनीय मूर्ती


