Buldhana News : बुलढाण्याला वादळाचा तडाखा, झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे. याच दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे मोठं नुकसानं झालं. या वादळामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता. या झोक्यात चिमुकली झोपली होती. पण वादळाच्या तडाख्यात पत्रे उडाले आणि त्यासोबतच चिमुकली झोपलेला झोका देखील उडाला आहे. साई भरत साखरे असं या चिमुकलीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळाचा मोठा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं भर पावसाळ्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतमाल, बी-बीयाणं आणि खतांच्या गोण्या भिजल्यानं मोठं नुकसान झालं.
याचदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता. या झोक्यात चिमुकली झोपली होती. मात्र वादळाच्या तडाख्यात पत्र उडले. पत्र्यांसोबत ही चिमुकली ज्या झोक्यामध्ये होती तो झोका देखील उडाला. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
June 12, 2024 1:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : बुलढाण्याला वादळाचा तडाखा, झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली


