कौटुंबिक वादातून चढला टॉवरवर, गळफास लावून मारली उडी; घटनेचा धक्कादायक VIDEO व्हायरल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
व्यक्तीने कौटुंबीक वादातून मोबाईल टॉवरवर चढत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गावातील युवक आणि पोलिसांच्या सतर्कतेने त्याला वाचविण्यात यश आले.
राहुल खंडारे, बुलडाणा : कौटुंबिक वादातून मोबाईल टॉवरवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. टॉवरवर चढल्यानंतर त्याने उडी मारण्याआधी गळफास लावून घेतला आणि त्यानंतर उडी मारली. यावेळी खाली असलेल्या गावातील ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वाचवण्यात यश आलं. बुलढाण्याच्या हिवरा आश्रम इथं ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरा आश्रम येथील रमेश सरकटे या व्यक्तीने कौटुंबीक वादातून मोबाईल टॉवरवर चढत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गावातील युवक आणि पोलिसांच्या सतर्कतेने त्याला वाचविण्यात यश आले. त्याच्यावर सध्या मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे मेहकर येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
advertisement
गळफास घेतानाचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कौटुंबिक वादातून रमेश सरकटे हे गावातील मोबाईल टॉवरवर चढले. टॉवरवर जाऊन त्यांनी पोलिसांना बोलावण्याची मागणी केली आणि जीव देणार असल्याचे सांगितले. ही बाब काहींनी तातडीने पोलिसांना कळवली. घटनेचे गांभीर्य पाहाता पोलिस घटनास्थळी पोहचले. सरकटे यांनी यावेळी चिठ्ठी लिहून खाली फेकली आणि काही लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस त्याला खाली उतरण्यास सांगत होते, मात्र काही क्षणात सरकटे यांनी दोरी गळ्यात लावली आणि खाली उडी घेतली. मात्र युवक आणि पोलीस यांनी तत्काळ दोरी काढून खाली घेतल्याने जीव वाचला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 31, 2024 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
कौटुंबिक वादातून चढला टॉवरवर, गळफास लावून मारली उडी; घटनेचा धक्कादायक VIDEO व्हायरल


