Buldhana : पोलिसांसमोरच आमदाराने तरुणाला बेदम चोपले, मारहाणीचा VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
आमदारांकडून तरुणाला बेदम मारहाण आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात या प्रकरणी कोणतीच तक्रार झालेली नाही.
राहुल खंडारे, बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजंयतीच्या कार्यक्रमावेळी पोलिसांच्या काठीने एका तरुणाला त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदाराकडून तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीच्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आमदार गायकवाड हे वादात आहेत. शिकार केलेल्या वाघाचा दात गळ्यात घातल्याचा प्रकार त्यांनी केला होता. त्यानंतर महिलेची शेती हडपल्याचा आरोप असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यातच मारहाणीचा प्रकार समोर आल्यानं ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा १९ फेब्रुवारीचा आहे. शिवजंयतीच्या मिरवणुकीत तरुणाला पोलिसांनी धरले होते. तरी आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या हातातील काठी घेत तरुणाला मारहाण केली. लोकप्रतिनिधींकडून कायदा हातात घेत अशी मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
दरम्यान, आमदारांकडून तरुणाला बेदम मारहाण आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात या प्रकरणी कोणतीच तक्रार झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आली तर प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2024 6:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : पोलिसांसमोरच आमदाराने तरुणाला बेदम चोपले, मारहाणीचा VIDEO VIRAL









