Buldhana: विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या मुख्याध्यापकांनीच शाळेत उचललं टोकाचं पाऊल, बुलडाणा हादरलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
एक धक्कादायक घटना समोर आलीय. श्री शिवाजी हायस्कूल मध्ये मुख्याध्यापकांनी गळफास घेतल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राहुल खंडारे, बुलडाणा: बदलती जीवनशैली आणि वाढता तणाव यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात आणि डिप्रेशनचा शिकार होतात. काही लोक तर थोड्याशा कारणावरुनही टोकांचं पाऊल उचलतात. त्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्या आणि टोकांचं पाऊल उचलण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. श्री शिवाजी हायस्कूल मध्ये मुख्याध्यापकांनी गळफास घेतल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका मधील जानेफळ येथे मुख्याध्यापकांनी शाळेतच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रत्नाकर शिवाजी गवारे वय वर्षे 55 असे मुख्याध्यापकाचे नाव असून यांनी शाळेचत गळफास घेतल्याचा प्रकार घडला.
Ambadas Danve : 'कुटनीतीच्या काळात..' अंबादास दानवे यांच्या मनातील खदखद बाहेर, स्टेटस ठेवत म्हणाले..
advertisement
शाळेतील शिपयाने बघितले असता गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आलं. सदर माहिती तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करण्यात आला. मुख्याध्यापक यांनी आत्महत्या का केली कारण मात्र समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 27, 2024 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana: विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या मुख्याध्यापकांनीच शाळेत उचललं टोकाचं पाऊल, बुलडाणा हादरलं


