advertisement

अजितदादांना धक्का पक्का.. माजी मंत्री रामराम ठोकणार, म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेऊ

Last Updated:

माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

अजित पवार आणि शरद पवार
अजित पवार आणि शरद पवार
बुलडाणा : महाराष्ट्र विधानसेच्या निवडणुका जाहीर होताच तुतारी हाती घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील त्यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेत मंगळवारी रीघ लागली होती. यात प्रामुख्याने अजित पवार यांच्यासोबत असलेल्या सहकारी होते. अशातच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही दादांना धक्का देण्याची तयारी केली आहे.
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. निवडणूक कशी लढावी, कुठून लढावी यासंदर्भात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज बैठक संपन्न झाली. तुतारी चिन्हावरच लढावे, अशी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे सांगत मी कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, असे उघडपणे शिंगणे यांनी सांगत काहीच दिवसांत पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले.
advertisement
कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा 'तुतारी'वरच लढा!
शिंगणे म्हणाले, "आज संपन्न झालेल्या बैठकीत तुतारी चिन्हावर लढावे, अशी भावना मतदार कार्यकर्ते आणि जनतेची होती. मतदारसंघात फिरत असताना लोक मला तुतारी घेऊनच लढा, असा आग्रह धरत आहेत. समाजातल्या सगळ्याच घटकांचा मला आग्रह आहे. २९ तारीख शेवटची असल्याने ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे, म्हणून तातडीने आजची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे, या मताचा मी आहे"
advertisement
कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेणार
"आदरणीय शरद पवारांसोबत जाऊन निवडणूक लढवावी असे ९९ टक्के पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले. मी त्यांना सांगितलं मी केवळ मतदारसंघापुरता मर्यादित नाही. मी जिल्हाभरात जाऊन पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेईन. परंतु कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेऊ" असे शिंगणे म्हणाले.
पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी घडलो
पुढे बोलताना शिंगणे म्हणाले, आमच्या वडिलांपासून पवारसाहेबांचे आमच्याशी संबंध आहेत. मी राजकारणात आलो १९९५ साली... अपक्ष म्हणून निवडून आलो. पण तेव्हापासून पवारसाहेबांनी मला मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हापासून मी पक्षात पवारसाहेबांसोबत काम केले, त्यांनी मला मंत्री केले, राज्यात काम करण्याची संधी दिली, आसे आवर्जून शिंगणे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
अजितदादांना धक्का पक्का.. माजी मंत्री रामराम ठोकणार, म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय घेऊ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement