लघुशंकेसाठी ट्रॅव्हल्समधून खाली उतरला, तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला; पैशांनी भरलेल्या बॅगेच्या चोरीचा Live video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीवर पाळत ठेऊन त्याच्याकडे असलेली पैशांची बॅग चोरट्यांनी टॅव्हल्समधून लांबवली आहे. या बॅगमध्ये साठ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर पाळत ठेऊन चोरट्यांनी ट्रॅव्हल्समधून 60 लाख रुपये असलेली बॅग पळवली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी गावाजवळ घडली आहे. प्रमोदसिंग परमार असं या व्यक्तीचं नाव आहे. परमार हे ज्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते, ती ट्रॅव्हल्स विश्वगंगा हॉटेवर थांबली होती. यावेळी ते लघुशंकेसाठी म्हणून खाली उतरले. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. परमार हे कुरिअर सर्व्हिस कंपनीचे पैसे घेऊन अकोल्याहून मुंबईकडे निघाले होते. याचदरम्यान हा प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
एका व्यक्तीवर पाळत ठेऊन त्याच्याकडे असलेली पैशांची बॅग चोरट्यांनी टॅव्हल्समधून लांबवली आहे. बुलढाण्यामधील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. pic.twitter.com/CctnBx4WfX
— News18Lokmat (@News18lokmat) February 11, 2024
संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता. व्यक्तीने परमार यांची पैशांची बॅग उचलली, त्यानंतर तो धावत समोर उभ्या असलेल्या कारकडे गेला. त्यानंतर तो कारमध्ये बसला आणि ती कार निघून गेली.या प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
February 11, 2024 4:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
लघुशंकेसाठी ट्रॅव्हल्समधून खाली उतरला, तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला; पैशांनी भरलेल्या बॅगेच्या चोरीचा Live video


