बुलढाण्यात वाहन चालकाच्या क्रुरतेचा कळस; जखमी व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जातो सांगितलं अन् दरीत फेकून दिलं, तडफडून मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बुलाढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. मालवाहू वाहनाच्या चालकानं क्रूरपणाचा कळस केला आहे. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून त्यानंतर या जखमी व्यक्तीला त्याने जंगलात फेकले, वेळेत उपचार न भेटल्यानं या व्यक्तीचा तरफडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश महाजन असं या चालकाचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मालवाहू वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो, असे सांगून चालकाने जखमीला जंगलातील दरीत टाकून दिल्याची घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं अपघातग्रस्त व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील तरुण मन्साराम छत्तरसिंग वासकले वय २२ वर्ष हा एका लग्नानिमित्त भिंगारा येथे गेला होता. मात्र लग्न आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने संध्याकाळी गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर त्याच्या दुचाकीला मालवाहू गाडीने जोरदार धडक दिली . यामध्ये तो गंभीर जखमी झाला . यावेळी रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांनी त्या जखमीला त्याच मालवाहू वाहनात टाकून दवाखण्यात न्यायला सांगितले .
advertisement
मात्र वाहनचालकाने पुढे गेल्यानंतर जखमी मन्साराम वासकले याला जंगलातील दरीत फेकून दिले घरच्यांनी शोध घेतला असता आणि पोलिसांत तक्रार दिल्यावर दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह जंगलात आढळला. उपचाराअभावी त्याचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चालकाला अटक केली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
May 05, 2024 11:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाण्यात वाहन चालकाच्या क्रुरतेचा कळस; जखमी व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जातो सांगितलं अन् दरीत फेकून दिलं, तडफडून मृत्यू


