Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना मोठा धक्का, हिंगोलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:sachin Salve
Last Updated:
मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीतील वसमत इथं मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले होते.
हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता राज्यभरात दौरा करत आहे. अशातच हिंगोलीच्या वसमत शहर आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाणे अशा दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला आहे. त्यांच्यासह 80 ते 90 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
हिंगोलीच्या वसमत इथं मनोज जरांगे पाटील यांच्यासह 80 ते 90 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीतील वसमत इथं मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले होते. विनापरवाना मोटरसायकल रॅली काढणे, विनापरवाना लाऊड स्पीकर लावणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
तसंच, वसमत शहर पोलीस ठाणे व वसमत ग्रामीण पोलीस ठाणे अशा दोन्ही पोलीस ठाण्यामध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह जवळपास 70 ते 80 जणांविरोधात तर वसमत शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह जवळपास दहा जणांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
शिंदे समितीला मुदतवाढ
दरम्यान, मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमुर्ती संदीप शिंदे समिती चा कालावधी वाढवण्यात आला आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली होती. याची मुदतवाढ करून आता शिंदे समितीला 30 एप्रिल 2024 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 2023 रोजी महायुतीच्या सरकारने या शिंदे समितीची स्थापना केली होती.
Location :
First Published :
March 13, 2024 11:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना मोठा धक्का, हिंगोलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई