Mumbai- Pune News : यंदाचा दसरा- दिवाळी होणार खास, धावणार विशेष रेल्वे; कधीपासून Reservation करता येणार?

Last Updated:

Mumbai- Pune Special Trains : सणासुदीच्या काळात नोकरी- व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mumbai- Pune News : यंदाचा दसरा- दिवाळी होणार खास, धावणार विशेष रेल्वे; कधीपासून Reservation करता येणार?
Mumbai- Pune News : यंदाचा दसरा- दिवाळी होणार खास, धावणार विशेष रेल्वे; कधीपासून Reservation करता येणार?
शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारखे महत्वाचे सण पुढच्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपले आहेत. सणासुदीच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. परिणामी या काळात वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.
नागपूर- पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवली जाणार आहे. नागपूर- पुणे- नागपूर या साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या एकूण 20 सेवा होणार आहेत. 01209 या रेल्वे गाडीची विशेष सेवा 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून संध्याकाळी 07:40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 10 सेवा होतील. तर, 01210 या रेल्वे गाडीची विशेष सेवा 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी पुणे येथून दुपारी 03:50 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता पोहोचेल.
advertisement
या गाडीच्या एकूण 10 सेवा होतील. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर रेल्वेला थांबा मिळणार आहे. चार वातानुकूलित ३- टियर, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी संपूर्ण रेल्वेची संरचना राहणार आहे.
advertisement
तर दुसऱ्या ट्रेनबद्दल सांगायचं तर, लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस या साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्सप्रेसच्याही एकूण 20 सेवा होणार आहेत. 02139 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 12:25 वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी दुपारी 03:30 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 10 सेवा होतील. 02140 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून दुपारी 01:30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 04:10 वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 10 सेवा होतील.
advertisement
या सुपरफास्ट एक्सप्रेसला मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटल्यानंतर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल. तीन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय, २ सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी संपूर्ण रेल्वेची संरचना राहणार आहे.
advertisement
पुणे-नागपूर या विशेष एक्सप्रेसचे आरक्षण विशेष शुल्कासह ०८ सप्टेंबरपासून, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेसचे आरक्षण विशेष शुल्कासह ०९ सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर सुरू होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai- Pune News : यंदाचा दसरा- दिवाळी होणार खास, धावणार विशेष रेल्वे; कधीपासून Reservation करता येणार?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement