Aurangzeb Kabar: औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, पण कबर खुलताबादला का? काय आहे खरा इतिहास?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Aurangzeb Kabar: मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू अहमदनगरजवळ झाला. पण त्याची कबर खुलताबाद येथे बांधण्यात आली. याचा इतिहास जाणून घेऊ.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: सध्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. पण औरंगजेबाचा मृत्यू खुलताबाद येथेच झालाच नाही. तर तत्कालिन अहमदनगरजवळच्या भिंगार येथे झाला. परंतु, त्याची कबर औरंगाबादजवळील खुलताबाद येथे बांधण्यात आली. यामागे देखील एक इतिहास आहे. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास अभ्यासक डॉ. गणी पटेल यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
औरंगजेब हा मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज यांचा तिसरा मुलगा होता. ‘अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद’ असं त्याचं पूर्ण नाव आहे. 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. तत्कालिन हिंदुस्थानवर 49 वर्षे राज्य करणाऱ्या औरंगजेबाचा शेवट भयानक झाला. 3 मार्च 1707 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अहमदनगर येथील भिंगार येथे त्याचा वार्धक्य आणि नैराश्याने मृत्यू झाला.
advertisement
कबर खुलताबादला का?
अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला औरंगाबादमधील खुलताबाद येथे आणण्यात आले. औरंगजेब सुफी संत शेख झैनुद्दीन यांना गुरू मानत होता. त्यांच्या दर्ग्याच्या परिसरातच मृत्यूनंतर आपल्याला दफन करावे अशी त्याची इच्छा होती. त्यानुसार मुलगा आझमशाह याने खुलताबाद येथे झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाचे दफन केले आणि कबर बांधली, असं डॉ. पटेल सांगतात.
advertisement
औरंगजेबाचं मृत्यूपत्र
औरंगजेबाला आपल्या मृत्यूची चाहूल लागल्यानंतरच त्यानं आपलं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. त्यात त्यांनं आपल्या मृत्यूनंतरच्या दफनविधी आणि कबरीबाबत लिहून ठेवले होते. त्यात अंतिम संस्कार कोणताही गाजावाजा न होता करावे. समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी. अंतिम संस्कार औरंगजेबाच्या स्वकमाईच्या पैशातून करावेत, असे लिहिले होते.
कशी आहे औरंगजेबाची कबर?
औरंगजेबाच्या इच्छेचा मान ठेवून मुलगा आझमशाह याने अवघ्या 14 रुपये 12 आणे इतक्या पैशात त्याची कबर उभारली. हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून मिळवले होते. त्यामुळे औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगर पासून जवळ असलेल्या खुलताबाद या ठिकाणी आहे. तसंच कबर अत्यंत साध्या पद्धतीने बांधण्यात आलेली आहे. या कबरी वरती औरंगजेबाच्या इच्छेनुसार फक्त एक सब्जाच झाड आहे. त्याला वरून कोणत्याही प्रकारचं छत नाहीये, अशी माहितीही इतिहास अभ्यासक गणी पटेल यांनी दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 20, 2025 1:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Aurangzeb Kabar: औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, पण कबर खुलताबादला का? काय आहे खरा इतिहास?







