रेल्वे बोर्डाचा एक निर्णय अन् मराठवाड्यातील 20000 प्रवाशांना फटका, काय बदल होणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Railway: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे बोर्डाच्या एका निर्णयाचा रोज 20 हजार प्रवाशांना फटका बसणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रेल्वेचं मोठं जाळं असून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. छत्रपती संभाजी नगर शहरातून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आता मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून संभाजीनगरहून जाणाऱ्या चार एक्सप्रेस गाड्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक वगळून धावणार आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाने आदेश निर्गमित केला असून त्याचा मराठवाड्यातील 20 हजार प्रवाशांना रोज फटका बसणार आहे.
छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या 4 एक्स्प्रेस आता सिकंदराबाद रेल्वे स्थानक वगळून धावणार आहेत. याबाबत नियोजनासाठी रेल्वे बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेला 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्याचा फटका रोज शहरातून हैदराबादला जाणाऱ्या 8 हजारांहून अधिक प्रवाशांना बसणार आहे. सध्या सहापैकी चार गाड्या सिकंदराबादहून जातात. त्यातील अजंता एक्स्प्रेसला अत्यल्प कोटा असून तिला सिकंदराबाद येथे थांबा नाही. देवगिरी व गुंटूर एक्स्प्रेस गैरसोयीच्या ठरत असून 4 गाड्यांचा मार्ग बदलल्याने शहरातील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
advertisement
सध्या नरसापूर नगरसोल (12787), नरसापूर नगरसोल (17231), साईनगर शिर्डी-मछलीपट्टणम (17207), साईनगर शिर्डी- काकीनाडा (17205) या साप्ताहिक एक्स्प्रेस सिकंदराबाद स्थानकावरून धावतात. त्यांना भविष्यात सिकंदराबाद वगळून चालवण्यास रेल्वे बोडनि मान्यता दिली आहे. त्यामुळे आता संबंधित रेल्वे चारलापल्ली व मौलाअली जी कॅबिन स्थानकावरून जाणार आहेत. सिकंदराबाद स्थानकापासून हे अंतर 8 किमी आहे. सध्या दररोज छत्रपती संभाजीनगर ते सिकंदराबाद 3 रेल्वे धावतात. सोमवारी 3 अतिरिक्त गाड्या धावत असून बुधवारी सर्वाधिक 5 साप्ताहिक रेल्वे असतात.
advertisement
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून तिरुपतीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज 3 रेल्वे तिरुपतीला जात असतात. तर अनेकजण सिकंदराबाद येथून कनेक्टिंग रेल्वेने तिरुपतीला जात असतात. आता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील 8 हजार प्रवाशांना तर जालना, परभणी येथून दर दिवशी 12 हजार प्रवाशांना फटका बसेल.
नियमित रेल्वे
advertisement
- संभाजीनगर-गुंटूर संभाजीनगर-गुंटूर निघण्याची निघण्याची वेळ दुपारी 4.15 वाजता असून सिकंदराबादला सकाळी 5.28 वाजता पोहोचेल.
- देवगिरी एक्सप्रेस संभाजीनगराहून सकाळी 4.20 वाजता निघते आणि सिकंदराबादला पोहोचते दु. 4.20 वाजता पोहोचते.
- अजंता एक्स्प्रेस संभाजीनगराहून रात्री 10.45 वाजता निघते आणि काचीगुडाला सकाळी 9.45 वाजता पोहोचते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 15, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रेल्वे बोर्डाचा एक निर्णय अन् मराठवाड्यातील 20000 प्रवाशांना फटका, काय बदल होणार?


