advertisement

पतीनंतर मोठा मुलगा गेला, 19 वर्षाच्या लेकानंही वर्षभरातच शेवट केला, आईचा आक्रोश, छ. संभाजीनगरात हे काय घडलं?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वर्षाच्या आत आख्खं कुटुंबच संपल्याची दुर्दैवी घटना घडलीये. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलांनी टोकाचं पाऊल उचलंल.

पतीनंतर मोठा मुलगा गेला, 19 वर्षाच्या लेकानंही वर्षात शेवट केला, आईचा आक्रोश, छ. संभाजीनगरात हे काय घडलं?
पतीनंतर मोठा मुलगा गेला, 19 वर्षाच्या लेकानंही वर्षात शेवट केला, आईचा आक्रोश, छ. संभाजीनगरात हे काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर : एका कुटुंबावर गेल्या वर्षभरात दुःखाचे असे सावट आले की, उभा संसारच उद्ध्वस्त झाला. प्रथम वडिलांचे निधन… त्यानंतर काही महिन्यांत मोठ्या मुलाची आत्महत्या… आणि त्या जखमा भरत नाहीत तोच शनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी 19 वर्षीय धाकट्या मुलानेही गळफास घेतला. एकामागोमाग एक घरातील तिघेजण मरण पावल्याने आईवर कोसळलेले दुःख शब्दांत मावणे कठीण आहे. मनोज तुकाराम मोकासे (वय 19, रा. शफेपूर, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
वडिलांच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी मनोजकडे होती. मोठा भाऊ गेल्यानंतर आईचा एकमेव आधार म्हणूनच तोच कुटुंबाला सावरत होता. मात्र शनिवारी सकाळी मनोजनेही राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस येताच गावात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे बीट जमादार वसंत पाटील, दत्तू लोखंडे व विजय भोटकर यांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची खात्री केली. डॉक्टर बनसोडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.
advertisement
शनिवार सकाळी शफेपूरच्या स्मशानभूमीत मनोजचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी आईच्या आक्रोशाने हृदय पिळवटून निघाले. वर्षभरात वडील आणि दोन्ही मुलांना गमावल्याने संसाराचा संपूर्ण आधारच हरपल्याचे चित्र उपस्थितांना असह्य झाले.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तू लोखंडे व वसंत पाटील पुढील तपास करीत आहेत.
advertisement
दरम्यान, एकाच कुटुंबात झालेले सलग मृत्यू पाहून शफेपूर परिसरातील ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. आईसाठी दोन्ही मुलगेच जणू जीवनाचा आधार होते… आणि तो आधार क्षणार्धात हिरावून गेला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पतीनंतर मोठा मुलगा गेला, 19 वर्षाच्या लेकानंही वर्षभरातच शेवट केला, आईचा आक्रोश, छ. संभाजीनगरात हे काय घडलं?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement