हृदयद्रावक! लेकीच्या लग्नात बाप मनसोक्त नाचला, पण ती भेट ठरली शेवटची, दुसऱ्याच दिवशी..

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: लेकीच्या लग्नात वडील मनसोक्त नाचले अन् लग्नघरातील आनंदाचे वातावरण काही तासातच दु:खाद बदलले. बाप-लेकीची पाठवणीतील ती भेट शेवटचीच ठरली.

हृदयद्रावक! लेकीच्या लग्नात बाप मनसोक्त नाचला, पण ती भेट ठरली शेवटची, दुसऱ्याच दिवशी..
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नात बाप मनसोक्त नाचला, पण ती भेट ठरली शेवटची, दुसऱ्याच दिवशी..
छत्रपती संभाजीनगर: लेकीच्या लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. दोन महिन्यांपासून घरात नुसती धावपळ सुरू होती. शेवटी लग्नाचा दिवस आला आणि लेकीच्या लग्नात बाप मनसोक्त नाचला. परंतु, नियमतीच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. मुलीची पाठवणी केल्यानंतर अवघ्या काही तासातच वडिलांनी जगाचाच निरोप घेतला. बाप-लेकीची पाठवणीतील ती भेट शेवटचीच ठरली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील संतोषीमाता नगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. प्रकाशसिंह भिकूसिंह ताटू असे 60 वर्षीय मृत वडिलांचे नाव आहे. ताटू यांची मुलगी दीपाली हिचा मंगळवारी विवाह झाला. ज्या घरातून दीपाली बोहल्यावर चढली तिथेच दुसऱ्या दिवशी वडिलांची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा दारातील मंडप देखील तसाच होता.
advertisement
लाडक्या लेकीच्या लग्नात नाचले
लग्नासाठी पाहुणे, मित्र, आप्तेष्ट लग्नघरी आदल्या दिवशीच दाखल झाले होते. दारात मांडव टाकला होता. मुलीला हळद लागली अन् मंगळवारी सायंकाळी लग्नही लागलं. दीपाली ही प्रकाशसिंह याची लाडकी लेक असल्याचं जवळचे सांगतात. त्यामुळे मुलीच्या हळदीत आण लग्नात ते खूप नाचले. बुधवारी पहाटे 4 वाजता मुलीची पाठवणी झाली. त्यानंतर प्रकाशसिंह हे घराच्या गच्चीवर जाऊन झोपले. मात्र, ते पुन्हा उठलेच नाहीत. हृदविकाराच्या झटक्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
advertisement
भाऊ आणायला गेला अन्..
प्रकाशसिंह यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे. दीपाली ही चौथ्या क्रमांकाची मुलगी आहे. लग्न लागल्यानंतर दीपाली सासरी गेली आणि भाऊ तिला परत आणायला गेला होता. त्याचवेळी ही बातमी समजली. लग्नघरातील आनंदाचे वातावरण काही तासातच दु:खाद बदलले. बहिणीला काहीही कळू न देता तो तिला घेऊन घरी परतला. परंतु, घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून लेकीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून सर्वजण हळहळले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नात बाप मनसोक्त नाचला, पण ती भेट ठरली शेवटची, दुसऱ्याच दिवशी..
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement