मलेरिया आणि तापासाठी रामबाण, फुलांनी बहरलेला सुगंधी सप्तपर्णी वेधतोय छ. संभाजीनगरकरांचे लक्ष

Last Updated:

या फुलांचा सुवास परिसराला पसरला आहे. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात सप्तपर्णी कधी बहरलेला नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

+
फुलांनी title=फुलांनी बहरलेला सुगंधी 'सप्तपर्णी' वेधतोय लक्ष
/>

फुलांनी बहरलेला सुगंधी 'सप्तपर्णी' वेधतोय लक्ष

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही आठवड्यांपासून शहरात एका सुवासाने सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे. रस्त्याच्या कडेला अनेक आशि सप्तपर्णीची झाडे सध्या भरगच्च फुलांनी बहरलेली आहे. या फुलांचा सुवास परिसराला पसरला आहे. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात सप्तपर्णी कधी बहरलेला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. तर या झाडाविषयी मानत वन्यजीव संरक्षण डॉक्टर किशोर पाठक यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
लवकर वाढ होणारा, कोणताही ऋतूत सावली देणारा आणि कायम हिरवेगार वृक्ष म्हणून सप्तपर्णीची ओळख आहे. पावसाळ्याच्या अखेरीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात सप्तपर्णीला फुलांचा हंगाम असतो. मागील काही वर्षात जितका बहरला नसेल तितक्या जास्त प्रमाणात तो यंदा बहरला आहे. हे झाड पूर्णतः हे स्वदेशी आणि औषधीयुक्त आहे. तसंच अत्यंत गुणकारी हे झाड आहे. या झाडाच्या अनेक असे फायदे आपल्याला होतात. त्यामध्ये तुम्हाला कॅन्सरसाठी देखील या झाडाच्या सालीचा उपयोग होते. या झाडाच्या फुलांचा सुवास अधिक उग्र होतो. जुलाब, मलेरिया, ताप, अस्थमा, अल्सर, सर्पदंश आदी उपचारातही याचा वापर होतो, असं डॉक्टर किशोर पाठक सांगतात.
advertisement
ज्या लोकांना कुठलीही ॲलर्जी आहे अशा लोकांना या झाडाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो ज्या लोकांना कुठली ॲलर्जी आहे अशा लोकांनी या झाडाच्या जवळ जाणं टाळावं. पण हे झाड विषारी नाहीये किंवा विदेशी देखील नाहीये. हे झाड पूर्णपणे भारतीय आहे त्यामुळे हे झाड तुम्ही तोडू नका आणि कुठलाही गैरसमज आपल्या मनात ठेवू नका. उलट हे झाड अत्यंत गुणकारी आहे अनेक रोगावर या औषधांमुळे उपचार होऊ शकतात, असं देखील डॉक्टर किशोर पाठक यांनी सांगितले आहे.
advertisement
त्यामुळे सर्व लोकांनी या झाडाविषयी आपल्या मनात असलेले गैरसमज दूर करावे. हे सप्तपर्णीचे झाड अत्यंत गुणकारी झाड आहे. या झाडाचा फुलांचा उग्र वास येतो तरी देखील हे झाड अत्यंत फायदेशीर आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मलेरिया आणि तापासाठी रामबाण, फुलांनी बहरलेला सुगंधी सप्तपर्णी वेधतोय छ. संभाजीनगरकरांचे लक्ष
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement