Body Detox : निरोगी जीवनासाठी आयुर्वेदाची साथ, जाणून घ्या जुन्या-प्रभावी परंपरेचं महत्त्व

Last Updated:

निरोगी जीवन जगण्यासाठी, बहुतेक जण आता आयुर्वेदाचा आधार घेत आहेत. दरम्यान, आयुष मंत्रालयानं नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ऋतू शोधन या जुन्या पण अतिशय प्रभावी आयुर्वेदिक परंपरेबद्दलची माहिती दिली आहे.

News18
News18
मुंबई : आयुर्वेद ज्याचा वापर वर्षानुवर्ष होत आलाय आणि जगभरात ज्याचा प्रसार झाला त्या आयुर्वेदाचं आपल्या आयुष्यात अनमोल स्थान आहे. बदलत्या जीवनशैलीतही शरीराच्या अंतर्बाह्य रक्षणासाठी आयुर्वेदाच्या उपचार पद्धती महत्त्वाच्या आहेत.
निरोगी जीवन जगण्यासाठी, बहुतेक जण आता आयुर्वेदाचा आधार घेत आहेत. दरम्यान, आयुष मंत्रालयानं नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ऋतू शोधन या जुन्या पण अतिशय प्रभावी आयुर्वेदिक परंपरेबद्दलची माहिती दिली आहे.
advertisement
ऋतू शोधन म्हणजे ऋतूनुसार शरीर स्वच्छ करणं. हा केवळ एक उपचार नाही तर यामुळे शरीर आणि मनाला ताजंतवानं करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे.
ऋतु शोधन या प्रक्रियेअंतर्गत, विरेचन (रेचक) आणि वमन (विकार कमी करणारे) सारख्या उपचारांनी शरीर आतून शुद्ध केलं जातं. विरेचन म्हणजे शरीरातील विषारी मलमूत्र काढून टाकण्याची प्रक्रिया.
advertisement
दुसरीकडे, वमन म्हणजे मुद्दामून उलट्या करणं, जेणेकरून पोट आणि फुफ्फुसात जमा झालेले निरुपयोगी घटक बाहेर येतील. आयुर्वेदात या दोन्ही पद्धती पंचकर्माचा एक भाग मानल्या जातात.
उपचार ऋतूनुसार केले पाहिजेत जेणेकरून शरीर नैसर्गिकरित्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकेल. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात तेव्हा केवळ पचनसंस्थाच मजबूत होत नाही तर मानसिक स्थिती देखील सुधारते.
advertisement
ऋतू शोधन प्रक्रियेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या ताप, सर्दी आणि अ‍ॅलर्जीसारख्या सामान्य समस्यांपासून शरीराचं संरक्षण होतं. याशिवाय, लठ्ठपणा, अपचन, त्वचारोग किंवा मानसिक ताण यासारख्या जीवनशैलीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे.
advertisement
आयुर्वेदातील ही साधी तत्वं अंगीकारली आणि ऋतूनुसार शरीराची काळजी घेतली गेली तर आजारांपासून, संसर्गापासून शरीराचं रक्षण होतंच पण एकूणच आयुष्यासाठी ही चांगली आणि संतुलित उपचार पद्धती आहे, अशा शब्दात आयुष मंत्रालयानं आयुर्वेद आणि या उपचार पद्धतीचं महत्त्व सांगितलं आहे.
सध्याच्या जगात जेव्हा पूर्वीसारखं सकस अन्न मिळेल याची शाश्वती नाही, त्याच काळात पूर्वीपासून प्रचलित असलेली ऋतू शोधन सारख्या पारंपरिक उपचारपद्धतीचं महत्त्व अधोरेखित होतंय.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Body Detox : निरोगी जीवनासाठी आयुर्वेदाची साथ, जाणून घ्या जुन्या-प्रभावी परंपरेचं महत्त्व
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement