अपघात, अपहरण आणि पोलिसांना नडणं भोवलं, निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manorama Khedkar: रबाळे पोलिसांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी उघड अरेरावी केली असल्याचे समोर आले आहे.
पुणे : निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे , पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. रबाळे पोलिसांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान दिलीप आणि मनोरमा खेडकर पुण्यातील बंगल्यात फोन ठेवून फरार झाले आहेत. सोमवारी दुपारी पोलिसांनी खेडकर यांच्या घरी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली.
ऐरोलीमध्ये झालेल्या वाहन अपघातात एका व्यक्तीचे अपहरण करून आणून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी रबाळे पोलिस चौकशी करण्यासाठी पूजा खेडकरच्या घरी आले होते. पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना सरकारी काम करू दिले नाही. अपघातग्रस्त गाडी पळवून लावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज थेट गेटवर चढत घरात प्रवेश करून झाडाझडती घेतली. रबाळे पोलीसही यावेळी चौकशीसाठी आले होते.
advertisement
रबाळे पोलिसांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी उघड अरेरावी केली असल्याचे समोर आले आहे. रबाळे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात पोहोचले. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
प्रकरण नेमके काय?
नवी मुंबईत शनिवारी एक ट्रक मोटारीला घासून गेला. त्यावेळी तेथे चांगलाच वाद झाला. मोटार चालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याचे अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांचा बंगला गाठला. यावेळी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी मनोरमा खेडकर यांनी हुज्जत घातली. पोलिसांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांनी पोलिसांसोबत अरेरावीची भाषा केली. तसेच पोलिसांना चौकशी करता येऊ नये म्हणून त्यांनी पाळीव श्वानही बंगल्यात सोडले. त्यामुळे पोलिसांना चौकशीसाठी अडथळ निर्माण झाला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 15, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपघात, अपहरण आणि पोलिसांना नडणं भोवलं, निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल