Independence Day 2025 : महाराष्ट्रातील अनोखे मंदीर, जिथं मिळते 100 क्रांतिकारकांची माहिती, इतिहास काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. आणि त्यांची हीच माहिती पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठीच संभाजीनगर शहरात एका अनोख्या मंदिराची स्थापना केलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. आणि त्यांची हीच माहिती पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठीच संभाजीनगर शहरात एका अनोख्या मंदिराची स्थापना केलेली आहे. तर हे मंदिर नेमके कोणते आहे आणि या मंदिराचा इतिहास आहे? याविषयी आपल्याला माहिती माजी उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरांमधील रोपळेकर चौकाजवळ गुरुकुंज हाऊसिंग सोसायटी आहे या ठिकाणी हे भारत मातेचे मंदिर आहे. 1997 साली हे मंदिर बांधण्यासाठी ठरवले आणि 1999 साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. हे मंदिर बांधण्याचं मूळ उद्दिष्ट असे होते की इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे आणि हीच माहिती येणाऱ्या पुढच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी हे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
advertisement
याला सगळ्यांच्या वतीने परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये देशातील निवडक शंभर अशा क्रांतिकारकांची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मोठी भारत मातेची अशी मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे.
advertisement
सर्व क्रांतिकारकांची माहिती यामध्ये आहे आणि यामध्ये त्यांना कुठे फाशी देण्यात आली किंवा त्यांचे एकंदरीत कार्य काय होते हे सर्व या मंदिरात दाखवण्यात आलेले आहे. हे मंदिर सकाळी नऊ वाजता उघडते ते रात्री सात वाजेपर्यंत हे मंदिर सर्वांसाठी खुले असते. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क हे आकारण्यात येत नाही.
advertisement
हे मंदिर बांधण्याचा मूळ उद्देश असा होता की येणाऱ्या पिढीला सर्व माहिती झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही हे मंदिर बांधलेले आहे. ज्याला मंदिर हे नाव हे याकरिता दिले आहे की ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे ते आपल्या कायम स्मरणात राहावे आणि जागा पवित्र राहावी यासाठी याला आम्ही मंदिर नाव दिले आहे, असे माजी उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 13, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Independence Day 2025 : महाराष्ट्रातील अनोखे मंदीर, जिथं मिळते 100 क्रांतिकारकांची माहिती, इतिहास काय? Video